मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) महिला निवड समितीने सप्टेंबर २०२६ मध्ये जपानमधील ऐची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौर संघाची कर्णधार असेल, तर स्मृती मंधानाला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
चीनच्या हांगझू येथे २०२३ मध्ये झालेल्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकल्यामुळे भारतीय संघ गतविजेता म्हणून या स्पर्धेत उतरेल. नुकत्याच झालेल्या महिला टी-२० विश्वचषकात सहभागी झालेल्या बहुतांश खेळाडूंचाच संघात समावेश आहे. केवळ यास्तिका भाटियाला संघातून वगळण्यात आले आहे.
नाशिक : शहरभर गाजलेल्या बहुचर्चित टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी दानिश खान(danish Khan) आणि निदा खान(NidaKhan) यांच्या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी आता ६ जुलै ...
संघात अनुभवी क्रिकेटपटूंसोबतच युवा प्रतिभेचाही समावेश आहे. फलंदाजी विभागात शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा आणि यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोष यांचा समावेश आहे. जी. कमलिनी यांचा संघात दुसरी यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, राधा यादव आणि भारती फुलमाली गोलंदाजीची धुरा सांभाळतील. श्री चरणी, श्रेयंका पाटील आणि नंदिनी शर्मा संघाला अतिरिक्त बळ देतील. पण, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की श्रेयंका पाटीलची निवड तिच्या तंदुरुस्तीच्या मंजुरीवर अवलंबून असेल.
सुरक्षित व परवडणाऱ्या घरांसाठी सरकार कटिबद्ध; पुनर्विकास प्रकल्पांना वेग मुंबई : मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणारी ...
आशियाई खेळांसाठी संघ जाहीर होण्यापूर्वी, आयसीसी महिला टी-२०(T20) विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला. लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाने भारताला सहा गडी राखून पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर भारत स्पर्धेतून बाहेर पडला. हरमनप्रीत कौर (२७ BOLL ५६ RUNS), स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने चार बाद १७० अशी धावसंख्या उभारली. पण, एलिस पेरी आणि ॲशले गार्डनर यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १९ व्या षटकात लक्ष्य गाठले होते.






