Friday, February 27, 2026

Bigg Boss Marathi 6: अनुश्रीचा प्लॅन फसला; बिग बॉसमधील कपल पुन्हा एकत्र

Bigg Boss Marathi 6: अनुश्रीचा प्लॅन फसला; बिग बॉसमधील कपल पुन्हा एकत्र

मुंबई : ' बिग बॉस मराठी ६ 'च्या २६ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये बिग बॉस कॅप्टन्सी टास्क घेतात. पहिल्या फेरीत विशाल तन्वी, दीपाली यांना कॅप्टन्सीच्या फेरीतून बाद करतो. दीपाली विशालला सुनावते. अनुश्री टोळीचे प्लॅन काटा ग्रुपला सांगते. दुसऱ्या फेरीत विशाल आणि राकेशमध्ये बाचाबाची होते. रुचिता दुसऱ्या फेरीत रुचिता बझर दाबते. अनुश्री विशालच्या विरोधात रुचिताचे कान भरते. दुसऱ्या फेरीत रुचिता, राकेश आणि रोशनला कॅप्टन्सीच्या रेसमधून बाद करते. दीपाली उगाच लाग लावण्याचा प्रयत्न करते. अनुश्रीला विशालला कॅप्टन्सीच्या रेसमधून काढायचं असतं.

रुचिता म्हणते, 'विशाल आणि माझ्यामधून कोणाला काढायचं असेल तर मला काढा' त्यावर विशाल रुचिताला म्हणतो, 'मला माहितीये मी बाहेर गेलो तर जनतेच्या व्होटने जाईन, हे लोक मला नाही बाहेर काढू शकत' विशाल रुचिताला समजावतो. तिसऱ्या फेरीत रोशन बझर दाबतो. रोशन प्राजक्ता आणि विशालला कॅप्टन्सीच्या फेरीतून बाद करतो. अनुश्री, विशालच्या चुगलीबद्दल बोलते. अनुश्री, टोळी सोडते. विशाल आणि अनुश्रीमध्ये शाब्दिक चकमक होते. शेवटी, रुचिता कॅप्टन पदाची तिसरी उमेदवार होते. प्रभू, रुचिता आणि अनुश्री या तिघांमध्ये कॅप्टन्सी टास्क होणार, असं बिग बॉस सांगतात.

अनुश्रीने सोडली टोळी अनुश्री सगळीकडे आग लावून मोठमोठ्याने आरडाओरडा करते. दीपाली आणि तन्वी अनुश्रीला समजावतात. रुचिता विशालला म्हणते, 'मला तुझ्याविरुद्ध नाही बोलायचं, मला तुझ्यासोबत राहायचंय. तुझ्याशिवाय न राहणं मला खटकलंय' रुचिता आणि विशालमध्ये सगळं नॉर्मल होतं. अनुश्री, टोळीतून बाहेर पडल्यामुळे दीपालीला खूप आनंद होतो. तन्वीला अनुश्रीवर संशय येतो.

रुचिता, प्रभू आणि अनुश्रीमध्ये कॅप्टन्सी टास्क

दुसऱ्यादिवशी सकाळी अनुश्री, सागर आणि प्राजक्ताला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. तन्वी आणि राखीमध्ये शाब्दिक चकमक होते. राखी मुद्दाम राकेश आणि प्राजक्ताचं नाव एकमेकांसोबत जोडते. बिग बॉस अनुश्री, रुचिता आणि प्रभू यांच्यात कॅप्टन्सी टास्क घेतात.सदस्यांना जोड्यांमध्ये रील्स तयार करून कॅप्टन्सीचे दावेदार असलेल्या सदस्यांसोबत कॉलाबोरेट करायचे असतात. ज्यांचे रील्स जास्त व्हायरल होतील आणि ज्यांचे कॉलाबोरेशन्स जास्त असतील, तो सदस्य कॅप्टन होईल, असं बिग बॉस सांगतात. त्यामुळे आत उद्याच्या भागात कॅप्टन कोण होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा