नागपूर : ब्रिटिश एअरवेज बोईंग ७८७ हा विमान लंडनहुन हैद्राबादला येत होते. या विमानाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. त्यात १६९ प्रवासी प्रवास करत होते. विमानात तांत्रिक विघड झाल्याने ब्रिटिश एअरवेज कंपनीचे विमानाची आपत्कालीन लँडिंग नागपूर मध्ये करण्यात आलं, यामुळे १६९ प्रवाशांचे जीव भांड्यात पडला. आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकाने घेतलेल्या या निर्णयामुळेच १६९ प्रवाशांचे प्राण हे वाचू शकले आहेत. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
विमानात तांत्रिक बिघाडही होता शिवाय दरम्यान हैद्राबाद यामध्ये खराब हवामानामुळे विमानाला लँडिंगची परवानगी नाकारण्यात आली त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून नागपूर विमानतळावर विमान उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला . पहाटे साडे पाचच्या सुमारास विमान नागपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आपत्कालीन लँडिंगनंतर विमानाची तपासणी करण्यात आली असून प्रवाशांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या आधी काल रात्री रांची मध्ये नुकताच एअर ऍम्ब्युलन्सचा अपघात झाला. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे निधन झाले, विमानांच्या वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे विमान प्रवासाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
मुंबईत देखील एका हेलीकॉप्टरचा अपघात झाला आहे. वैमानिकाने तत्परता दाखवून समुद्रात सुरक्षित लँडिंग केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.







