Wednesday, February 11, 2026

Nagpur News : नागपूर हादरलं! १२ वीच्या विद्यार्थ्याचा ११ वीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ काढून धमकी दिली अन् नको नको ते...

Nagpur News : नागपूर हादरलं! १२ वीच्या विद्यार्थ्याचा ११ वीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ काढून धमकी दिली अन् नको नको ते...

नागपूर : शिक्षण आणि परीक्षेचे वय असलेल्या तरुणांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. ११ वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला असून, यात एका १२ वीच्या विद्यार्थ्याचा मुख्य सहभाग असल्याचे समोर आले आहे. या घटनेच्या धक्क्याने आरोपीच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांनी पीडित मुलीवर अत्याचार केला आणि या कृत्याचा व्हिडिओ चित्रीत केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांनी पीडितेचे वारंवार शोषण केले. अखेर पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर या भीषण कृत्याचा पर्दाफाश झाला. सध्या १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा १२ वीचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्याला तातडीने अटक केल्यामुळे त्याला परीक्षेचा पेपर देता आला नाही. आपल्या मुलाने असे घृणास्पद कृत्य केल्याचे आणि त्याला अटक झाल्याचे समजताच त्याच्या वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आणि त्यांना 'हार्ट अटॅक' आला.

नंदनवनमध्ये ११ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

नागपूरमध्ये नंदनवन इथे राहणाऱ्या एका ओळखीच्या तरुणाने अल्पवयीन तरुणीचा विश्वासघात करून तिच्यावर दोन मित्रांची मदत घेऊन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. इतकंच काय तर त्या पीडितेला अत्याचारानंतर तुझा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देऊन शोषण तिचं करण्यात आलं. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली आहे. पीडित तरुणी ११ वीत शिकत असून मुख्य आरोपी तिच्या ओळखीचा होता. तो गेल्या काही दिवसांपासून तिला अश्लील मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होता. 'घरी सर्वजण आहेत' असे खोटे सांगून त्याने पीडितेला आपल्या घरी बोलावले. मात्र, तिथे आधीच त्याचे दोन मित्र दबा धरून बसले होते. पीडिता घरी पोहोचताच आरोपीने तिला खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हे घृणास्पद कृत्य सुरू असताना दोन्ही मित्रांनी त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची भीती दाखवून त्या दोघांनीही पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेमुळे पूर्णपणे हादरलेल्या पीडितेने चार दिवस प्रचंड मानसिक दडपणाखाली मौन पाळले होते. अखेर धीर एकवटून तिने कुटुंबीयांना आपबिती सांगितली. पीडितेच्या कुटुंबाला या घटनेची माहिती मिळताच कुटुंबाने नंदनवन पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.

पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मा घटनेतील २ तरुण हे अल्पवयीन आहेत. मंगळवारी त्यांना अटक करण्यात आली. आता त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असल्याने बारावीला असलेल्या विद्यार्थ्याला आपला पेपर देता आला नाही. आपल्या मुलाच्या कृत्याची माहिती त्याच्या वडीलांना मिळताच त्यांना हार्ट अटॅक आला. त्यांनाही तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात खरोखर व्हिडीओ बनवला गेला का याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासाठी आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >