महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजक्राईम
Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?
July 16, 2026 06:59 PM
केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा
पुणे : केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. तपासातील सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी सिया आणि चेतन यांनी केतनला संपवण्यासाठी 'स्लो पॉयझन' ( Slow Poison) देण्याचाही कट रचला होता. मात्र, आवश्यक विषारी पदार्थ मिळू न शकल्याने हा कथित प्लॅन अयशस्वी ठरल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. (Ketan Agrawal Murder Case)
सूत्रांच्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांना एकत्र आयुष्य जगायचे होते. मात्र, सियाचा होणारा पती केतन त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्याला कायमचा मार्गातून दूर करण्यासाठी दोघांनी कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ( Maharashtra Crime)
स्लो पॉयझन देण्याचा प्लॅन
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतनच्या अन्न किंवा पेयामध्ये हळूहळू 'स्लो पॉयझन' मिसळण्याचा कथित प्लॅन तयार करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊन त्याचा मृत्यू व्हावा किंवा तो कायमचा अपंग व्हावा, असा आरोपींचा हेतू असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. ( Police Investigation)
या कटासाठी आवश्यक विष मिळवण्याचे प्रयत्नही करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, संबंधित पदार्थ मिळू न शकल्यामुळे हा कथित डाव पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे त्यानंतर आरोपींनी दुसरा मार्ग स्वीकारला का, याचाही तपास पोलीस करत आहेत. (Pune Crime)
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून विविध पुरावे, डिजिटल माहिती आणि आरोपींची चौकशी सुरू असून, प्रत्येक बाबीची पडताळणी केली जात आहे. तपास पूर्ण होईपर्यंत या दाव्यांबाबत अधिकृत निष्कर्ष आलेला नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Ketan Agrawal Murder )