कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये आयर्लंड विरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियाने ६७ धावांनी जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टोईनिस, रेनशॉ, जोश इंग्लिस यांनी अचूक टप्प्यांवर भेदक गोलंदाजी केली. यामुळे आयर्लंडचा डाव १६.५ षटकांत ११५ धावांत आटोपला. नॅथन एलिसने १२ धावा देत चार बळी घेतले. तर ॲडम झम्पाने २३ धावा देत चार बळी घेतले. याआधी ऑस्ट्रेलियाने २० षटकांत सहा बाद १८२ धावा केल्या. स्टॉइनिसने ४५ तर इंग्लिसने ३७ धावांचे योगदान दिले.
कर्णधार मिचेल मार्शच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाने चमकदार कामगिरी केली आणि आयर्लंड विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टोईनिसने २९ चेंडूत ४५, जोश इंग्लिसने १७ चेंडूत ३७, मॅट रेनशॉने ३३ चेंडूत ३७ धावांचे योगदान दिले.
धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग पहिल्याच चेंडूवर ’रिटायर्ड हर्ट’ झाला. नंतर नॅथन एलिसने आपल्या भेदक माऱ्याने आयर्लंडला सावरण्याची संधीच दिली नाही. त्याने पॉवरप्लेमध्येच तीन बळी घेत आयर्लंडला लागापाठ धक्के दिले. हॅरी टेक्टर (०) आणि रॉस ॲडायर (१२) लवकर परतले. नॅथन एलिस आणि ॲडम झम्पाने भराभर आयर्लंडचे फलंदाज बाद केले. यामुळे शेवटपर्यंतला आयर्लंडला डोकं वर काढण्याची संधीच मिळाली नाही.