Monday, February 9, 2026

किया इंडियाचा बीपीसीएलसोबत ईव्‍ही चार्जिंग सुविधेचा विस्तार

किया इंडियाचा बीपीसीएलसोबत ईव्‍ही चार्जिंग सुविधेचा विस्तार

मुंबई : किया इंडियाने आज भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) सोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केल्‍याची घोषणा केली. या सहयोगांतर्गत त्‍यांच्‍या सार्वजनिक ईव्‍ही चार्जिंग नेटवर्कचा विस्‍तार करण्‍यात आला आहे, तसेच त्‍यांची के-चार्ज परिसंस्‍था देशभरात १५,००० हून अधिक चार्जिंग टचपॉइण्‍ट्सपर्यंत वाढली आहे. हा धोरणात्‍मक सहयोग किया ईव्‍ही ग्राहकांसाठी चार्जिंग सुविधा अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देतो, तसेच इलेक्ट्रिक वेईकल अवलंबनामधील सर्वात मोठ्या अडथळ्यांचे निराकरण करतो, जेथे रेंजसंदर्भात आत्‍मविश्वास निर्माण करतो.

या विकासाबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाच्‍या सेल्‍स अॅड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्री. अतुल सूद म्‍हणाले, ''ईव्‍हीच्‍या अवलंबनामध्‍ये सोयीसुविधा व आत्‍मविश्वास अत्‍यंत महत्त्वाचे आहेत. बीपीसीएलसोबत या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही ईव्‍ही मालकीहक्‍काला ग्राहकांसाठी अधिक व्‍यावहारिक व विनासायास करत आहोत, जेथे मोठ्या प्रमाणात चार्जिंग सुविधा वाढवत आहोत. के-चार्ज नेटवर्कमध्‍ये वाढीसह किया ईव्‍ही ग्राहकांना अधिक खात्रीशीरपणे प्रवासाचे नियोजन करता येते, तसेच भारताच्‍या शाश्वत गतीशीलतेप्रती व्‍यापक परिवर्तनाला पाठिंबा मिळतो.''

भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलतेला गती मिळत असताना ईव्‍हींचा अवलंब करण्‍याचा विचार करत असलेल्‍या ग्राहकांसाठी चार्जिंग सुविधेची उपलब्‍धता महत्त्वपूर्ण घटक आहे. के-चार्जमध्‍ये बीपीसीएलच्‍या सार्वजनिक चार्जिंग पायाभूत सुविधेला एकीकृत करत किया इंडियाने दैनंदिन ईव्‍ही उपयुक्‍ततेला दृढ केले आहे, तसेच ग्राहकांना शहरी भाग, महामार्ग व आंतरशहरीय मार्गांवर विनासायास प्रवास करण्‍यास सक्षम करत आहे.

किया इंडिया आणि बीपीसीएल यांनी ओएनजीसी अकॅडमी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एटीआय), गोवा येथे २७ ते ३० जानेवारी दरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेल्‍या इंडिया एनर्जी वीक २०२६ च्‍या चौथ्‍या एडिशनदरम्‍यान या सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या केल्‍या. या करारांतर्गत कियाच्‍या के-चार्ज प्‍लॅटफॉर्मवर ३,००० हून अधिक बीपीसीएल चार्जिंग पॉइण्‍ट्स ऑनबोर्ड करण्‍यात येतील, ज्‍यासह नेटवर्कची राष्‍ट्रीय स्‍तरावरील उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढेल.

मायकिया अॅप आणि किया इंडिया वेबसाइटच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध असलेला के-चार्ज प्‍लॅटफॉर्म ग्राहकांना सहजपणे चार्जिंग स्‍टेशन्‍स शोधण्‍याची, तेथे पोहोचण्‍याची आणि सिंगल, युनिफाईड डि‍जिटल प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून चार्जिंगसाठी पेमेंट करण्‍याची सुविधा देतो. विस्‍तारित नेटवर्कमुळे स्‍वतंत्र चार्जिंग प्रदात्‍यांवरील अवलंबन कमी होईल आणि ईव्‍ही मालकीहक्‍क अनुभव अधिक खास होईल.

पायाभूत सुविधेचे विस्‍तारीकरण किया इंडियाच्‍या वाढत्‍या ईव्‍ही पोर्टफोलिओशी संलग्‍न आहे. किया इंडियाची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍हीला एैसपैस ७-सीटर कॉन्फिग्‍युरेशन आणि तंत्रज्ञान-केंद्रित ऑफरिंगसाठी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कियाच्‍या प्रीमियम जागतिक ईव्‍ही - ईव्‍ही६ आणि प्रमुख ईव्‍ही९ यांनी ब्रँडच्‍या भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलता उपस्थितीला अधिक दृढ केले आहे.

चार्जिंग पायाभूत सुविधा व परिसंस्‍था सहयोगांमध्‍ये सतत गुंतवणूकांसह किया इंडियाने इलेक्ट्रिक गतीशीलतेला अधिक सहजसाध्य, विश्वसनीय आणि ग्राहक-अनुकूल करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्‍यासह कियाच्‍या देशातील ईव्‍ही विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍याला पाठिंबा मिळत आहे.

Comments
Add Comment