Wednesday, February 4, 2026

पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या दरात वाढ

पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या दरात वाढ

मुंबई : अमेरिकेच्या विमानवहाक नौकेच्या दिशेने येत असलेले एक इराणी ड्रोन पाडण्यात आले आहे. ही बातमी अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्याचांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ दिसून आली. वाढत्या दरामुळे मध्यमवर्गीयांसाठी सोन्याची अथवा चांदीची खरेदी करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे चित्र आहे.

मुंबईत २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख साठ हजार ५३० रुपये एवढा झाला आहे. याआधी मंगळवार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख त्रेपन्न हजार ९३० रुपये होता. थोडक्यात सांगायचे तर २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याच्या दरात अवघ्या २४ तासांत सहा हजार सहाशे रुपयांची वाढ झाली आहे.

मुंबईत २२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख ४७ हजार १५० रुपये एवढा झाला आहे. याआधी मंगळवार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत २२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख ४१ हजार १०० रुपये होता. थोडक्यात सांगायचे तर २२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याच्या दरात अवघ्या २४ तासांत सहा हजार पन्नास रुपयांची वाढ झाली आहे.

मुंबईत एक किलो चांदीचा दर तीन लाख वीस हजार रुपये एवढा झाला आहे. याआधी मंगळवार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत एक किलो चांदीचा दर दोन लाख ऐंशी हजार रुपये एवढा होता. थोडक्यात सांगायचे तर मुंबईत एक किलो चांदीचा दर अवघ्या २४ तासांत ४० हजार रुपयांनी वाढला आहे.

Comments
Add Comment