Sunday, July 26, 2026

Wi-Fi Speed : नेटवर्कच्या समस्येला कंटाळला आहात? वायफायचा वेग वाढवण्यासाठी करा हे ४ घरगुती उपाय

Wi-Fi Speed : नेटवर्कच्या समस्येला कंटाळला आहात? वायफायचा वेग वाढवण्यासाठी करा हे ४ घरगुती उपाय

ॲल्युमिनियम फॉइल वापरून आपल्या घरातील Wi-Fi चा स्पीड कसा वाढवतात?

नेटवर्कच्या त्रासाला कंटाळून, बहुतेक लोक नवीन महागडा राउटर विकत घेण्याचा विचार करू लागतात. पण तुम्हाला माहित आहे का की, या मंद(Slow) वाय-फाय स्पीडची आणि डेड झोन्सची समस्या सोडवण्याचे रहस्य तुमच्या लिव्हिंग रूममध्ये नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरात दडलेले आहे. तुम्ही पोळ्या गुंडाळण्यासाठी किंवा अन्न गरम ठेवण्यासाठी वापरत असलेले ॲल्युमिनियम फॉइल तुमच्या घरातील इंटरनेटसाठी सिग्नल बूस्टर बनू शकते.

चला तर मग, ॲल्युमिनियम फॉइलचा(Aluminium Foil) वापर करून वाय-फायचा वेग आणि रेंज सुपरफास्ट करण्याच्या ४ सर्वात सोप्या आणि प्रभावी टिप्स जाणून घेऊया.

वाय-फायचा वेग कसा वाढवावा: तुमच्यासोबत कधी असे घडले आहे का की तुम्ही महत्त्वाचे ऑनलाइन काम करत आहात, एखादा आवडता कार्यक्रम पाहत आहात किंवा वर्क-फ्रॉम-होम मीटिंगमध्ये आहात आणि अचानक तुमचा वाय-फाय सिग्नल जातो किंवा स्लो होतो? कधीकधी असे होते की वाय-फाय एका खोलीत सुरळीत चालते, पण तुम्ही दुसऱ्या खोलीत प्रवेश करताच सिग्नल गायब होतो.

घराच्या विविध कोपऱ्यांतील मंद वाय-फाय सिग्नलची समस्या सोडवण्यासाठी महागडा नवीन राउटर विकत घेण्याची गरज नाही. स्वयंपाकघरातील ॲल्युमिनियम फॉइल आणि शीतपेयांचे(coldrinks) डबे उत्कृष्ट सिग्नल बूस्टर म्हणून काम करू शकतात. ॲल्युमिनियम फॉइलपासून पॅराबोलिक रिफ्लेक्टर तयार करून तो राउटरच्या अँटेनाच्या मागे ठेवल्यास सिग्नलची ताकद ५५% पर्यंत वाढू शकते.

ॲल्युमिनियम फॉइलचा एक तुकडा कापून, त्याला पॅराबोलिक (परवलयाकार) आकारात दुमडा आणि तुमच्या राउटरच्या अँटेनाच्या मागे ठेवा. हे एका डिशप्रमाणे काम करते, जे सिग्नलला पसरू न देता, त्याला थेट खोलीत निर्देशित करते. डार्टमाउथ कॉलेजमधील संशोधकांनी दाखवून दिले आहे की, यामुळे विशिष्ट भागांमध्ये सिग्नलची ताकद ५५% पर्यंत वाढू शकते.

एक रिकामा कार्डबोर्ड रोल घ्या, त्यावर ॲल्युमिनियम फॉइल लावा आणि तो तुमच्या राउटरच्या अँटेनावर ठेवा. ॲल्युमिनियम फॉइल रेडिओ लहरींना परावर्तित करून एकाच दिशेने केंद्रित करते.

स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे रिफ्लेक्टर्स घरातील वायरलेस कव्हरेज सुधारूण आणि अधिक मजबूत करू शकतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >