Thursday, May 2, 2024
Homeसाप्ताहिककोलाजसंगतीने केला घात

संगतीने केला घात

अॅड. रिया करंजकर

लालन शेठला त्यांचा मित्र शशिकांत दोन दिवस झाले सतत फोन करत होता. पण लालन शेठ काही फोन उचलत नव्हते म्हणून शशिकांतने इतर मित्रांच्या नंबरने त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला तरीही ते इतरांचे फोन उचलत नव्हते म्हणून शशिकांच्या मनात पाल चुकली आणि त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. त्यांचा नवीनच परिचय झालेला. मित्र फोन उचलत नाहीये. काहीतरी नक्कीच गडबड आहे, अशी शंका त्याने पोलिसांकडे व्यक्त केली आणि पोलिसांसह शशिकांत व इतर काही मित्र राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये गेले. तिथे गेले असता त्यांना असं जाणवलं की, रूम बंद आहे, एसी चालू आहे, मग लालन शेठ फोन का उचलत नाही. कितीतरी वेळा बेल वाजवली तरीही लालन शेठ काही दरवाजाही उघडत नव्हते म्हणून पोलिसांच्या मदतीने व सोसायटीच्या परमिशनने दरवाजा तोडण्यात आला आणि बघतात तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. लालन शेठ रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडलेले होते. त्यांच्यावर चाकूचे वार झालेले होते आणि त्यांचा घराचा एसी चालू ठेवण्यात आलेला होता. कदाचित यासाठी असेल की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचा दुर्गंधी पसरू नये. म्हणून ज्याने खून केलेला आहे त्यांने एसी चालू ठेवलेला होता म्हणजे सोसायटीतल्या लोकांना संशय येऊ नये. लालन शेठची डेड बॉडी पुढील कारवाईसाठी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली.

लालन शेठ हा गुजरातचा रहिवासी होता व नवीन बिझनेस करण्यासाठी तो मुंबई दाखल झालेला होता. मुंबईत त्याच्या एवढ्या ओळखी नव्हत्या. आपल्या परिवाराला गुजरातला ठेवून तू मुंबईत एकटाच आला होता आणि मुंबईत रूम भाड्याने मिळण्यासाठी त्याने अनेक सोसायटीमधल्या वॉचमनची ओळख करून घेतली होती. तो एवढा हुशार होता की, कुठल्याही प्रॉपर्टी डीलरकडे न जाता त्याने वॉचमन लोकांशी ओळख केली. कारण प्रॉपर्टी डीलरकडे गेलं तर ते एक भाडं घेतील. ते भाडं वाचवण्यासाठी त्यांनी वाचण्याची ओळख केली. वाचमनला थोडे पैसे दिले की काम होईल म्हणून त्याने वॉचमनला कुठे रूम मिळेल का, असं अनेक ठिकाणी सोसायटीमधल्या वाचमनना सांगितलं. त्यामुळे या वॉचमन आणि लालन शेठची ओळख निर्माण झालेली होती. लालनशेठ गुजरातवरून येताना सोबत पैसा दाग-दागिने घेऊन आला होता. कारण त्याला मुंबईमध्ये एक बिझनेस सेट करायचा होता. त्यासाठी तो राहण्याची व्यवस्था अगोदर बघत होता आणि असंच एका ठिकाणी त्याची राहण्याची व्यवस्था झाली. चांगल्या सोसायटीमध्ये आलिशान फ्लॅट त्याने भाड्याने घेतला आणि तो फ्लॅट वाचमनमार्फत मिळाला म्हणून त्याची मैत्री वाचमन बरोबर झाली तसेच बिझनेसच्या ओळखीसाठी नवीन नवीन मित्र त्याच्या संपर्कात येऊ लागले आणि या सगळ्यांना माहीत होतं की, हा प्रथमच मुंबईत येत आहे आणि याच्याकडे भरपूर पैसा आणि दाग-दागिने आहेत. हे लालन शेठशी ओळख झालेला लोकांना याची कल्पना आलेली होती. परिवार आणि नातेवाईक गावाला असल्यामुळे त्याची मित्रांशी जवळीक त्याची वाढली होती. रूमवर कोणी नसल्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या पार्ट्या लालन शेठ मित्रांबरोबर करत असे. मित्रांमध्ये लालन शेठ म्हणजे दयाळू माणूस म्हणून प्रसिद्ध झालेला होता.

या दिलदार माणसाचा असा निर्गुण खून कोण कोण करेल, हा प्रश्न आता पोलिसांना पडलेला होता. लालन शेठचा खून होण्याअगोदर त्याच्या रूमवर कोण कोण गेले, पार्टीसाठी याची तपासणी पोलीस करू लागले. जे बिझनेस पार्टनर होते त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या बोलण्यातून असं समजलं की, लालन यांची काही वॉचमेन लोकांशी ओळख आहे. तो त्यांनाही मदत करतो. पोलिसांनी आपला मोर्चा वॉचमन लोकांच्या दिशेने वळवला व जे त्याच्या संपर्कात होते, त्या सर्व वाचमन लोकांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि चौकशीला सुरुवात केली. पोलिसांनी पोलिसा खाक्या दाखवल्यावर वॉचमन भडाभडा बोलू लागले की, आम्हीच लालन शेठला संपवलेलं आहे. याच्या अगोदरही आम्ही तसा प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नाही. त्याच्याकडे भरपूर दागिने आणि पैसे होते त्याच्यावर या वॉचमेन लोकांचा डोळा होता आणि लालन शेठ साधा सरळ माणूस असल्यामुळे त्याचा गैरफायदा या वॉचमेनने घेतला. त्या दिवशी लालन शेठने त्यांना घरी बोलवलं होतं आणि छोटीशी पार्टी झाली होती. त्या पार्टीमध्ये लालन शेठ जास्त प्यायले होते आणि त्याचा फायदा यांनी उचलून लालन शेठचा खून केला व त्याची रोकड आणि दागिने त्यांनी पळवलेले होते.

लालन शेठने गरीब-श्रीमंत असा भेदभाव न ठेवता वॉचमननाही आपले मित्र मानले होते आणि याच मित्रांनी त्याला संपवलेलं होतं. लालचमुळे लालन शेठचा अंत त्याच्याच मित्रांनी केला होता.

(सत्य घटनेवर आधारित नाव बदललेले आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -