Home देश DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

0
DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे निर्माण होत असताना, भारताने स्वदेशी पर्यायाच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याचे वृत्त आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत Gas Turbine Research Establishment (GTRE) कडून कावेरी जेट इंजिनचे नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (DRDO Kaveri 2.0)

मिळालेल्या माहितीनुसार, ‘कावेरी 2.0’ हे नव्याने डिझाइन केलेले इंजिन विकसित केले जात असून ते सुमारे 90 किलो-न्यूटन (kN) वर्गातील थ्रस्ट देण्याच्या क्षमतेसह तयार केले जात आहे. भविष्यात यामुळे भारताची परदेशी इंजिनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. (DRDO Kaveri 2.0)

https://prahaar.in/2026/08/10/farmers-in-the-state-to-get-free-electricity-during-the-day-soon-chief-minister/

GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे चिंता :

तेजस Mk1A साठी अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिककडून F404 इंजिनांचा पुरवठा केला जातो. मात्र, इंजिनच्या पुरवठ्यात होणारा विलंब आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी यामुळे तेजसच्या उत्पादनाच्या गतीवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताकडून स्वदेशी जेट इंजिन विकसित करण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार, दशकाच्या अखेरीस तेजसच्या काही विमानांमधील इंजिन मिड-लाइफ रिप्लेसमेंटच्या टप्प्यावर पोहोचल्यास कावेरी 2.0 हा संभाव्य स्वदेशी पर्याय ठरू शकतो. (DRDO Kaveri 2.0)

कावेरी २.० मध्ये काय आहे खास?

१. 90-100 kN पर्यंत थ्रस्टची क्षमता
मूळ कावेरी इंजिन सुमारे 49-52 kN थ्रस्ट वर्गात होते. नव्या कावेरी 2.0 मध्ये आफ्टरबर्नरसह सुमारे 90-100 kN कमाल थ्रस्ट मिळवण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले जाते. (DRDO Kaveri 2.0)

२. नव्या पिढीचा हाय-प्रेशर कंप्रेसर
इंजिनच्या कोअरमध्ये बदल करून दबाव गुणोत्तर आणि इंधन कार्यक्षमता सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.

३. अॅडव्हान्स्ड टायटॅनियम ब्लिस्क
इंजिनचे वजन कमी करण्यासोबतच मजबुती आणि थ्रस्ट-टू-वेट रेशो सुधारण्यासाठी अत्याधुनिक टायटॅनियम अलॉय ब्लिस्क तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते. (DRDO Kaveri 2.0)

४. सिंगल-क्रिस्टल टर्बाइन ब्लेड
अत्यंत उच्च तापमानात इंजिनची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी सिंगल-क्रिस्टल टर्बाइन ब्लेडसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येत आहे.

५. स्टेल्थ UCAVसाठीही उपयोग
कावेरी इंजिनच्या ड्राय अर्थात नॉन-आफ्टरबर्निंग आवृत्तीचा वापर भारताच्या Ghatak स्टेल्थ कॉम्बॅट UAV कार्यक्रमासाठी केला जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. (DRDO Kaveri 2.0)

https://prahaar.in/2026/08/10/suspicious-death-of-abdul-aziz-a-mastermind-of-the-26-11-mumbai-attacks-he-suddenly-collapsed-at-the-mosque-gate-possibility-of-poisoning/

आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे पाऊल :

कावेरी 2.0 यशस्वीरीत्या विकसित आणि प्रमाणित झाल्यास भारताच्या लढाऊ विमानांसाठी इंजिन क्षेत्रातील परदेशी अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल ठरू शकते. मात्र, तेजस Mk1A मध्ये कावेरी 2.0चा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी इंजिनची चाचणी, प्रमाणन आणि विमानाशी एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे कावेरी 2.0 हे भारताच्या ‘आत्मनिर्भर संरक्षण’ मोहिमेसाठी महत्त्वाकांक्षी पाऊल असले तरी त्याचा तेजस Mk1Aमध्ये प्रत्यक्ष समावेश कधी आणि कसा होईल, हे पुढील चाचण्या आणि अधिकृत मंजुरीनंतरच स्पष्ट होणार आहे. (DRDO Kaveri 2.0)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here