Home साप्ताहिक अर्थविश्व Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात आज नरमाई; मात्र आठवडाभरात तब्बल ₹8,180 ची वाढ! जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात आज नरमाई; मात्र आठवडाभरात तब्बल ₹8,180 ची वाढ! जाणून घ्या आजचे नवीन दर

0
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात आज नरमाई; मात्र आठवडाभरात तब्बल ₹8,180 ची वाढ! जाणून घ्या आजचे नवीन दर
gold - silver

मुंबई : श्रावण, मंगळागौर, गणेशोत्सव आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या सण-समारंभांच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांचे लक्ष सध्या दरांकडे लागले आहे. 10 ऑगस्ट रोजी देशातील प्रमुख सराफा बाजारात सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. मात्र, गेल्या आठवड्याचा विचार केला तर सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसून आली आहे. (Gold Silver Rate Today)

आज 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात किंचित नरमाई पाहायला मिळाली. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचे दर महत्त्वाचे ठरू शकतात.

https://prahaar.in/2026/08/09/katraj-milk-prices-to-increase-by-two-rupees-per-liter-starting-tuesday-11-august-2026/

दिल्ली-मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

10 ऑगस्टच्या सकाळच्या उपलब्ध दरानुसार, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,52,540 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,39,840 प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,52,340 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,39,640 प्रति 10 ग्रॅम आहे.तर दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,52,540, तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,39,840 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबई आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,52,340, तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,39,640 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,51,630 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,39,000 प्रति 10 ग्रॅम आहे. हे दर 10 ग्रॅमसाठी आहेत. प्रत्यक्ष दागिन्यांच्या खरेदीवेळी मेकिंग चार्ज, जीएसटी आणि इतर शुल्कांमुळे अंतिम किंमत वेगळी असू शकते. (Gold Silver Rate Today)

आठवडाभरात सोनं किती महागलं?

आज दरात काहीशी घसरण झाली असली तरी मागील सात दिवस सोन्यासाठी तेजीचे ठरले. उपलब्ध माहितीनुसार, या कालावधीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ₹8,180 ची वाढ, तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे ₹7,600 ची वाढ झाली. सोन्याच्या किमतीवर देशांतर्गत मागणीबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरची स्थिती आणि जागतिक आर्थिक घडामोडींचा परिणाम होत असतो. (Gold Silver Rate Today)

https://prahaar.in/2026/08/09/petrol-price-in-india-today-relief-on-petrol-and-diesel-prices-continues-today-rates-remain-stable-in-major-cities-including-mumbai-check-the-latest-prices-here/

चांदीचा भावही नरमला :

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही आज काहीशी नरमाई दिसून आली. 10 ऑगस्ट रोजी सकाळी चांदीचा भाव ₹2,44,900 प्रति किलो इतका होता. मात्र, गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात सुमारे ₹10 हजारांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरू असून, उपलब्ध माहितीनुसार स्पॉट सिल्व्हरचा भाव 63.29 डॉलर प्रति औंस इतका होता. (Gold Silver Rate Today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here