Home क्रीडा Judoka Tulika Maan : ज्युदोपटू तुलिका मानचे ‘नाडा’कडून तात्पुरते निलंबन

Judoka Tulika Maan : ज्युदोपटू तुलिका मानचे ‘नाडा’कडून तात्पुरते निलंबन

0
Judoka Tulika Maan  : ज्युदोपटू तुलिका मानचे ‘नाडा’कडून तात्पुरते निलंबन

नवी दिल्ली : भारताची आघाडीची ज्युदोपटू तुलिका मान हिला ‘नाडा’च्या (National Anti-Doping Agency) नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीने तात्पुरत्या निलंबनाची (प्रोव्हिजनल सस्पेंशन) कारवाई केली आहे. लोकेशन किंवा वास्तव्याची माहिती देण्यास वारंवार अपयशी ठरल्यामुळे तिच्यावर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.खेळाडूने नॅशनल अँटी-डोपिंग रूल्स २०२१ मधील कलम २.४ चे उल्लंघन केल्याचा संशय असल्याचे ‘नाडा’ने खेळाडूला पाठवलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. रजिस्टर्ड टेस्टिंग पूलमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंनी आपल्या वास्तव्याची अचूक माहिती देणे बंधनकारक असते, ज्यामध्ये ती अपयशी ठरली आहे.

https://prahaar.in/2026/07/24/supreme-court-hearing-on-two-petitions-against-the-lathi-charge-to-be-held-in-the-supreme-court-on-july-27/

‘नाडा’च्या नियमांनुसार या प्रकरणाची पुढील कारवाई पार पाडली जाईल. ‘नाडा’ने स्पष्ट केले की, तुलिका मान सतत रजिस्टर्ड टेस्टिंग पूलचा भाग राहिली असून, १६ डिसेंबर २०२३ आणि २२ जानेवारी २०२६ रोजी पाठवलेल्या ई-मेलद्वारे तिला ‘ॲ’डम्स’ प्रणालीवर वास्तव्याची अचूक माहिती वेळच्या वेळी सादर करण्याबाबत अवगत करण्यात आले होते. खेळाडूने दिलेल्या वेळेत आणि ठिकाणी तिचा डॉप नमुना गोळा करण्यासाठी डोपिंग कंट्रोल अधिकारी पाठवण्यात आले होते. मात्र, ठरवलेल्या दोन वेगवेगळ्या चाचणी सत्रांच्या वेळी तुलिका मान तिथे अनुपस्थित असल्याचे आढळून आले. ‘नाडा’ने १० ऑक्टोबर २०२५ रोजी खेळाडूला याची माहिती दिली आणि २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ही चुक अधिकृतपणे नोंदवली गेली. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी तुलिकेला याबाबत कळवण्यात आले आणि २२ मे २०२६ रोजी ही चूक अधिकृतपणे रेकॉर्ड करण्यात आली. त्यानंतर १९ जून २०२६ रोजी ‘नाडा’ने या अधिसूचनेत एक दुरुस्तीपत्रक जारी केले होते.

https://prahaar.in/2026/07/24/corrupt-irctc-official-arrested-in-mumbai-cbi-takes-action/

जागतिक अँटी-डोपिंग कोड आणि राष्ट्रीय अँटी-डोपिंग नियमांनुसार, १२ महिन्यांच्या कालावधीत लोकेशन न देण्याच्या किंवा चाचणी चुकवण्याच्या एकूण तीन चुका झाल्यास ते अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन मानले जाते. तुलिका मानचे प्रकरण कलम २.४ च्या कक्षेत येत असल्याचा आरोप करत ‘नाडा’ने शिस्तभंगाच्या कारवाईचा निकाल लागेपर्यंत तिला तात्पुरते निलंबित केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तोंडावर भारतीय ज्युदोसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या +७८ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकणारी तुलिका मान ग्लास्गो स्पर्धेसाठी भारताची सर्वात प्रबळ पदक दावेदार मानली जात होती. भारतीय ज्युदो संघाची मोहीम ३१ जुलैपासून सुरू होणार असून, हा संघ २७ जुलै रोजी ग्लास्गोसाठी रवाना होणार आहे. (Judoka Tulika Maan)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here