Home क्रीडा Asian Cup Schedule 2026 : एशियन गेम्स २०२६ चे वेळेपत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार ?

Asian Cup Schedule 2026 : एशियन गेम्स २०२६ चे वेळेपत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार ?

Asian Cup Schedule 2026 : एशियन गेम्स २०२६ चे वेळेपत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार ?

मुंबई : एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धा जपानमधील आयाची नागोया येथे खेळली जाणार आहे. एशियन गेम्समध्ये क्रिकेट खेळाचा चौथ्यांदा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी २०१० (ग्वांगझू), २०१४ (इंचॉन) आणि २०२३ (हांगझोऊ) या स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला होता.भारत पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये एशियन गेम्स क्रिकेट स्पर्धेत गतविजेता आहे. यामुळेच यंदाही भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Asian Cup Schedule 2026 )

https://prahaar.in/2026/07/24/trais-major-move-to-curb-road-accidents-what-is-the-state-of-the-art-v2x-technology/

एशियन गेम्स २०२६ पुरुष क्रिकेट स्पर्धा २४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना एक ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश हे चार संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळतील. तर उरलेल्या चार जागांसाठी सहा संघांमध्ये पात्रता सामने होतील. पात्रता फेरीसाठी सहा संघ दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. गट ‘अ’ मध्ये अफगाणिस्तान, जपान, नेपाळ आणि गट ‘ब’ मध्ये हाँगकाँग, मलेशिया, ओमान हे संघ आहेत.

https://prahaar.in/2026/07/24/north-maharashtras-tallest-iskcon-temple-to-be-built-in-the-dwarka-area/

महिला गटाचे सामने कधी होणार ?

एशियन गेम्समध्ये महिला क्रिकेट गटाचे सामने १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत. भारतीय महिला संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रवेश देण्यात आला आहे. भारतीय महिला संघाने २०२३ च्या हांगझोऊ येथे झालेल्या एशियन गेम्स क्रिकेट स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. गतविजेता भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात यजमान जपानविरुद्ध उपांत्यपूर्व (क्वार्टरफायनल) फेरीत करणार आहे. भारत-जपान सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत बांगलादेश किंवा चीन यांच्याशी भिडेल. दरम्यान, इतर उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये श्रीलंकेचा सामना मलेशियाशी, तर पाकिस्तानचा सामना थायलंडशी होणार आहे.

https://prahaar.in/2026/07/24/ind-vs-afg-history-in-the-making-during-the-india-afghanistan-series-something-unprecedented-in-the-history-of-cricket-is-set-to-happen/

भारत-पाकिस्तान सामना कधी होणार ?

एशियन गेम्स २०२६ मध्ये आधी सहा संघांमध्ये पात्रता फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. या दोन्ही गटांमधील टॉप-२ संघांना पुढच्या फेरीत जाता येणार आहे. जिथं भारत आणि पाकिस्तानची मॅच केवळ सेमीफायनल किंवा फायनलमध्येच शक्य आहे. पण दोन्ही वेळी श्रीलंका आणि बांगलादेशने बाजी मारली, तर भारत किंवा पाकिस्तान क्वार्टरफायनलमध्येच हरतात तर हा सामना होणार नाही. दोन्ही संघांना आधी एक विजय मिळवावा लागणार आहे, यामुळे भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. (Asian Cup Schedule 2026 )

 

 

https://prahaar.in/2026/07/24/residential-training-based-on-israeli-standards-for-candidates-selected-for-employment-in-israel/

एशियन गेम्ससाठी भारतीय पुरुष संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि वैभव सूर्यवंशी

एशियन गेम्ससाठी भारताचा महिलांचा संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टिरक्षक), जी. कमलिनी (यष्टिरक्षक), भारती फुलमाळी, श्री चरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गायकवाड, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, राधा यादव आणि नंदिनी शर्मा