Friday, July 24, 2026

Maharashtra Saints : महाराष्ट्राच्या संतपरंपरेची ओळख, महाराष्ट्रातील महान संत आणि त्यांची समाधीस्थळे!

Maharashtra Saints : महाराष्ट्राच्या संतपरंपरेची ओळख, महाराष्ट्रातील महान संत आणि त्यांची समाधीस्थळे!
संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळ – आळंदी, पुणे. (Pune) अवघ्या २१व्या वर्षी संजीवन समाधी घेतलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी 'ज्ञानेश्वरी'सारखा अमूल्य ग्रंथ दिला.
    संत तुकाराम महाराज समाधीस्थळ – देहू, पुणे. तुकाराम महाराजांच्या अभंगांनी भक्ती, समानता आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला. देहू हे वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते.     संत नामदेव महाराज समाधीस्थळ – नरसी नामदेव, हिंगोली. (Hingoli) संत नामदेवांनी विठ्ठलभक्तीचा संदेश देशभर पोहोचवला. त्यांचे समाधीस्थळ भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे.     संत एकनाथ महाराज समाधीस्थळ – पैठण, छत्रपती संभाजीनगर. (Chhatrapati Sambhajinagar) 'एकनाथी भागवत' आणि भारुडांच्या माध्यमातून समाजजागृती करणारे संत म्हणून त्यांची ओळख आहे.     संत निवृत्तिनाथ महाराज समाधीस्थळ – त्र्यंबकेश्वर, नाशिक. (Nashik) नाथ संप्रदायातील महान संत आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे ज्येष्ठ बंधू असलेले निवृत्तिनाथ महाराज हे ज्ञान, वैराग्य आणि अध्यात्माचे प्रतीक मानले जातात. त्यांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे.     संत सोपानदेव महाराज समाधीस्थळ – सासवड, पुणे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू असलेले संत सोपानदेव महाराज यांनी अभंगरचनेतून भक्तीचा संदेश दिला. त्यांची समाधी पुणे जिल्ह्यातील सासवड येथे असून वारकरी संप्रदायासाठी ते महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.     संत गाडगेबाबा समाधीस्थळ – अमरावती. (Amravati) स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजसेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या गाडगेबाबांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.     संत चोखामेळा समाधीस्थळ – पंढरपूर, सोलापूर. (Solapur) समतेचा आणि अखंड विठ्ठलभक्तीचा संदेश देणारे संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ विठ्ठल मंदिर परिसरात आहे.     संत गोरा कुंभार समाधीस्थळ – तेर, धाराशिव. (Dharashiv) मातीची भांडी घडवत असतानाच भक्तीचा मार्ग स्वीकारणारे संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत मानले जातात.     संत सावता माळी समाधीस्थळ – अरण, सोलापूर. शेतकरी असतानाही अखंड विठ्ठलभक्ती करणारे संत सावता माळी हे श्रम आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >