Home ब्रेकिंग न्यूज Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

0
Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा

मुंबई : राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी राज्यावरील पाणीटंचाईचे संकट अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाही. प्रमुख धरणक्षेत्रात काही प्रमाणात पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली असली तरी, राज्यातील प्रमुख दहा धरणांतील उपयुक्त पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ टक्क्यांनी कमी आहे. पावसाचे असमान वितरण आणि भूजल पातळीतील घसरणीमुळे राज्यातील २२ जिल्ह्यांतील ७३७ गावे आणि १ हजार ९१८ वाड्यांना आजही ७९० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पावसाने पुन्हा ओढ दिल्यास राज्यात पाणी आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

https://prahaar.in/2026/07/16/m-s-dhonis-radio-earwig-at-edgbaston-sparks-discussion-india-secures-a-resounding-victory-over-england/

राज्यातील कोयना, जायकवाडी, उजनी, पेंच प्रकल्प समूह, गोसीखुर्द, खडकवासला, मुठा, अप्पर वर्धा, भंडारधारा आणि इसापूर या प्रमुख दहा धरणांमध्ये सध्या १८४.४७ टीएमसी (४५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा २७८.४४ टीएमसी इतका होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा घटल्यामुळे चिंता वाढली आहे. नाशिक विभागात पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर असून, तिथे सर्वाधिक ३०० टँकर्सद्वारे पाणी पुरवले जात आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण अद्याप समाधानकारक नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. (Water Crisis)

https://prahaar.in/2026/07/16/supreme-court-expresses-strong-displeasure-over-the-three-language-policy-introducing-a-new-language-from-class-9-imposes-unnecessary-stress-on-students/

मुंबईची स्थिती काय?

दुसरीकडे, मुंबई आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा मात्र तुलनेने समाधानकारक आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जलचिंता काहीशी कमी झाली आहे. मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ एक टक्का कमी पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यास मुंबईच्या पाणी नियोजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. (Mumbai Update)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here