Nashik : निवडणूक कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आलेल्या बीएलओ कर्मचाऱ्याला भाजपच्या नगरसेविका मोनिका हिरे (Monika Hire) आणि कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयात दाखल केले. तातडीने अँजिओप्लास्टी (Angioplasty) झाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असून या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हिरे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या तत्पर मदतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
https://prahaar.in/2026/07/16/supreme-court-expresses-strong-displeasure-over-the-three-language-policy-introducing-a-new-language-from-class-9-imposes-unnecessary-stress-on-students/
नेमकं काय घडलं ?
प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) लिपिक म्हणून कार्यरत असलेले कुणाल जगन्नाथ कलाल हे सध्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील फुलेनगर (Phulenagar) परिसरातील राहुलवाडी येथील महापालिका शाळा क्रमांक ५६ जवळील सभागृहात ‘बीएलओ’ म्हणून कर्तव्य बजावत आहेत. मंगळवारी दुपारी सुमारे एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान काम सुरू असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या.
याच वेळी केंद्राला भेट देण्यासाठी आलेल्या भाजपच्या नगरसेविका मोनिका हिरे, सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे तसेच अजिंक्य पगारे, सोनू दोंदे आणि बाबा शेख यांनी कलाल यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात घेतले. त्यांनी कोणताही विलंब न करता त्यांना समोरील डॉ. अविनाश पाटील यांच्या दवाखान्यात नेले.
https://prahaar.in/2026/07/16/m-s-dhonis-radio-earwig-at-edgbaston-sparks-discussion-india-secures-a-resounding-victory-over-england/
प्राथमिक तपासणीनंतर डॉ. पाटील यांनी पुढील उपचारासाठी पंचवटी येथील खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने कलाल यांना कार्डियाक केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्वरित अँजिओप्लास्टी केली. उपचारानंतर त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.