Home क्राईम Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि…

Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि…

0
Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि…

मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत

मुंबई : मुंबईच्या वांद्रे (Bandra) परिसरातून कथितरित्या अपहरण (Kidnapping) करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींची मुंबई पोलिसांनी बहुराज्यीय शोधमोहीम राबवत उत्तराखंडमधून सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून अपहरणामागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. (Mumbai Police)

https://prahaar.in/2026/07/16/latur-doctors-death-suspicious-death-of-a-renowned-doctor-in-latur-what-exactly-happened/

घराबाहेरून अचानक बेपत्ता

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली वांद्रे येथील घराबाहेर अंगणात खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्या. त्यानंतर बीकेसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला कोणताही ठोस सुगावा न लागल्याने पोलिसांनी तांत्रिक पाळत, डिजिटल ट्रॅकिंग आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. ( Bandra kidnapping)

https://prahaar.in/2026/07/16/mpsc-exams-to-remain-offline-for-now-online-exam-system-to-start-from-august-2027-directives-from-chief-minister-devendra-fadnavis/

पोलिसांनी मागोवा घेत…

तपासादरम्यान मुलींचा माग प्रथम नालासोपारा (Nalasopara) येथे लागला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मागोवा घेत उत्तराखंडपर्यंत पोहोचत दोन्ही मुलींची सुखरूप सुटका केली. या कारवाईदरम्यान आरोपीला अटक करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक साधनांचा वापर आणि विविध राज्यांतील पोलिसांमधील समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी झाली. अपहरणामागील हेतू, मुलींना राज्याबाहेर नेण्यामागील कारणे आणि आरोपीचे इतर संबंध यांचा तपास सध्या सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, बेपत्ता आणि अपहरणाच्या प्रकरणांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि आंतरराज्यीय समन्वयामुळे अशा गुन्ह्यांची उकल जलदगतीने करता येत आहे. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ( Minor girls rescued)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here