Home ब्रेकिंग न्यूज Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

0
Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा
BMC Health,

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधांचे रुग्णसेवेच्या बाबतीत नावलौकिक आहे. परंतु , रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिले आहेत.प्रामुख्याने महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

https://prahaar.in/2026/06/26/the-government-is-positive-about-the-development-of-the-holy-site-of-alandi/

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालय अंतर्गत चंदनवाडीस्थित दवाखाना, आरोग्य केंद्र, पॉलिक्लिनिक, ठाकूरद्वार येथील सूर्यकांत वगळ प्रसूतिगृह, जी (North) विभाग कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन प्राजक्ता लवंगारे यांनी शुक्रवारी २६ जून २०२६ रोजी पाहणी केली. तसेच, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा व आरोग्य सुविधांचा मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला. त्यावेळी वर्मा बोलत होत्या. उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (Medical Education and Major Hospitals) डॉ. शैलेश मोहिते, सहायक आयुक्त (C Division) अलका ससाणे, सहायक आयुक्त (G North Division) योगेश देसाई आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/06/26/devendra-fadnavis-and-uddhav-thackerays-joint-flight-journey/

प्राजक्ता लवंगारे यांनी शुक्रवारी सकाळी चंदनवाडीस्थित दवाखान्याला भेट दिली असता, दवाखान्याच्या नोंदणी विभागापासून औषधी, हिवताप निर्मूलन, प्रयोगशाळा, रुग्ण उपचार आदी विभागांची तसेच प्रसाधनगृहांची प्रत्यक्ष पाहणी केली. एचएमआयएस संगणकीय प्रणाली, सर्वाधिक आढळणाऱ्या आजारांचे प्रकार, रुग्णांची स्थिती, उपचार पद्धती आणि अडचणी आदींची माहिती जाणून घेतली. तसेच, चंदनवाडी आरोग्य केंद्रास भेट देऊन त्यांनी राष्ट्रीय अभियान अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रम, योजना, लसीकरण आदींबाबत माहिती जाणून घेतली. दरम्यान, ठाकूरद्वार येथील सूर्यकांत वगळ प्रसूतिगृहाच्या भेटीवेळी त्यांनी गरोदर माता आणि त्यांच्या नवजात बालकांची आस्थेने विचारपूस केली.

https://prahaar.in/2026/06/26/there-will-be-no-rainfall-in-june-heavy-rain-will-lash-down-starting-from-this-date/

पाहणी दौऱ्यानंतर दुपारी प्राजक्ता लवंगारे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा व आरोग्य सुविधांचा मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी व्यापक प्रयत्न व्हावेत. प्रसूतिगृहांमध्ये उत्तमोत्तम सुविधा असाव्यात. प्रामुख्याने महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. स्मशानभूमींच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, रुग्णाला पुढील आवश्यक उपचारासाठी एका ठिकाणाहून (आरोग्य केंद्र, पॉलिक्लिनिक, दवाखाना) अन्य आरोग्य यंत्रणेकडे (सर्वसाधारण रुग्णालये, सुपरस्पेशालिटी रुग्णालये) पाठवण्यासाठी डिजिटल, संगणकीकृत आणि जीआयएस-आधारित यंत्रणा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश प्राजक्ता लवंगारे यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here