Home ब्रेकिंग न्यूज TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

0
TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक
TET EXAM

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक
बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा परिषदेची माहिती

महाराष्ट्र : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET) महिला उमेदवारांना बुरखा, दुपट्टा किंवा ओढणी परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील. मात्र परिक्षा सुरू असताना वर्गखोलीत उमेदवाराचा चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक असेल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

https://prahaar.in/2026/06/26/implement-measures-to-provide-more-effective-healthcare-facilities-for-women-and-children/

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतर्फे येत्या २८ जूनला शिक्षक पात्रता (TET) परीक्षा घेतली जाणार आहे. गेल्या काही काळापासून परिक्षांमधील वाढते गैरप्रकार आणि डमी उमेदवारांचे रॅकेट पाहता परिक्षा परिषदेने यंदा सर्व परीक्षा केंद्रांवर ‘लाइव्ह सीसीटीव्ही यंत्रणा’ कार्यान्वित केली आहे. अशा स्थितीत चेहरा झाकलेल्या उमेदवारांमुळे ओळख पटवणे अशक्य होते. डॉ. बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ओळख आणि बायोमेट्रिक पडताळणीसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये उमेदवाराचा चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक आहे.

https://prahaar.in/2026/06/26/dhananjay-munde-questions-the-vilas-ghule-murder-case-demands-an-impartial-investigation/

उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन अशा विविध परीक्षांमध्येही चेहरा झाकण्याला प्रतिबंध करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून परिक्षांमध्ये कानात अतिशय लहान आकाराचे ब्लूटूथ किंवा वायफाय इअरफोन वापरून कॉपी करण्याचे प्रकार वाढले आहेत. तोंड झाकलेले असल्यास आतल्या आत कोण एकमेकांशी बोलत आहे हे देखील समजणे कठीण होते. गैरप्रकार टाळण्यासाठीच सर्व उमेदवारांचा चेहरा, मान, तोंड आणि कान स्पष्ट दिसणे गरजेचे असल्याचे परिक्षा परिषदेने म्हटले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here