Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिकमध्ये होणाऱ्या २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना आता महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे. सिंहस्थाच्या महत्त्वाच्या रस्ते कामांमध्ये विलंब करणाऱ्या तब्बल चार ठेकेदारांवर (Contractor) दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका ठेकेदार कंपनीवर तब्बल ९१ हजार रुपये प्रतिदिन दंड ठोठावण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/06/09/delivery-by-minor-girl-proves-costly/
सिंहस्थ कामात दिरंगाई महागात
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, लाखो भाविक आणि साधू-महंतांच्या सोयीसुविधांसाठी विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. महापालिकेमार्फत पहिल्या टप्प्यात शहरातील २८ महत्त्वाच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र काही ठिकाणी कामांचा वेग मंदावल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रत्येक प्रकल्पाचे टप्पे निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. एवढेच नव्हे तर त्रयस्थ संस्थेमार्फतही कामांचा दर्जा आणि प्रगती तपासली जात आहे.
https://prahaar.in/2026/06/09/major-revelation-in-the-ashok-kharat-case/
कंपनीला तब्बल ९१ हजार रुपये प्रतिदिन दंड
मात्र, काही ठिकाणी रस्ते कामांना विलंब होत असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अंबड लिंक रोडचे काम करणाऱ्या एसबीडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (SBD Infrastructure Private Limited) या कंपनीवर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून, कामात दिरंगाई झाल्यामुळे या कंपनीला तब्बल ९१ हजार रुपये प्रतिदिन दंड ठोठावण्यात आला आहे.
याचबरोबर दिंडोरी रोडच्या (Dindori Road) कामालाही विलंब होत असल्याने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. तर मखमलाबाद रोडच्या
( Makhmalabad Road ) कामातही अपेक्षित गती नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महालक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर (Mahalakshmi Infrastructure) या ठेकेदारावर १० हजार रुपये प्रतिदिन दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.याशिवाय आणखी दोन ठेकेदारांवरही प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याची माहिती शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली आहे.
https://prahaar.in/2026/06/09/the-menace-of-power-lines-claims-the-lives-of-ten-innocent-citizens/
महापालिकेचा स्पष्ट संदेश
सिंहस्थसारख्या जागतिक स्तरावरील धार्मिक सोहळ्याच्या तयारीत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश महापालिकेने या कारवाईतून दिला आहे. आता या दंडानंतर रखडलेली कामे वेग पकडणार का ? आणि सिंहस्थपूर्वी सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होणार का? याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.