डॉक्टरांना सवलत, मग नर्सेसना का नाही?
एका विशेष मुलाखतीत कंगनाने वैद्यकीय क्षेत्रातील एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. ती म्हणाली की, रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना त्यांच्या व्यावसायिक पेहरावात काही प्रमाणात सूट दिली जाते, ते त्यांच्या कम्फर्टनुसार कपडे निवडू शकतात. मात्र, परिचारिका आजही अशा एका पारंपरिक ड्रेस कोडमध्ये अडकलेल्या आहेत, ज्याचा लूक पूर्णपणे परदेशी आणि पाश्चात्य वाटतो.
State Women's Commission issues : हिंदू विधीज्ञ परिषदेच्या तक्रारीवरून राज्य महिला आयोगाचे पोलीस आयुक्तांना निर्देश !
नाशिकमधील ‘टी.सी.एस्.’ मधील हिंदू महिलांच्या धर्मांतराविषयी चौकशी अहवाल सादर करा ! मुंबई - नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या बहुराष्ट्रीय ...
दुसऱ्या महायुद्धाचा आणि अमेरिकन नौदलाचा प्रभाव
नर्सेसच्या गणवेशाच्या इतिहासावर बोलताना कंगनाने सांगितले की, या डिझाईनमध्ये अनेक वर्षांपासून कोणताही मोठा बदल झालेला नाही. नर्सेस वापरत असलेली कॅप, पिन आणि बेल्ट या गोष्टी तिला 'यूएस नेव्ही'च्या (US Navy) युनिफॉर्मची आठवण करून देतात. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात असे गणवेश वापरले जायचे. कंगना म्हणाली, "आपण आजही ब्रिटिश नर्सेसचाच ड्रेस कोड जसाच्या तसा फॉलो करत आहोत. पण असे असले तरी, चित्रपटात काम करताना आम्ही नर्सेसच्या या गणवेशाचा आणि त्यांच्या निस्वार्थ सेवेचा पुरेपूर आदर राखला आहे. शेवटी, तुमचा आकार किंवा ठेवण महत्त्वाची नसून, तुमची ड्युटी हाच तुमचा खरा युनिफॉर्म असतो."नर्सेसच्या सोयीनुसार हवा 'भारतीय टच'
?si=vZHD43lG3Gd-xfF6 या गणवेशात भविष्यात सकारात्मक बदल व्हावेत, अशी आशा कंगनाने व्यक्त केली. ती म्हणाली की, बाहेरचे हवामान कितीही गरम किंवा थंड असो, नर्सेसना एका विशिष्ट परदेशी लुकमध्येच राहावे लागते. भविष्यात जर नर्सेसना स्वतःला या बदलाची गरज वाटत असेल, तर त्यांच्या सोयीनुसार आणि पसंतीनुसार या गणवेशाला 'भारतीय रंगरूप' (Indian Touch) दिले गेले पाहिजे, हा नक्कीच एक स्वागतार्ह बदल ठरेल.






