मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक, वेगवान आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रश्नपत्रिका थेट ई-मेलद्वारे परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक आणि सुरक्षेशी संबंधित अनेक अडचणींवर मात होणार असल्याचे मानले जात आहे. (Maharashtra Board)
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि राज्य शिक्षण मंडळ यांच्यात मुंबईतील मुख्यालयात झालेल्या संयुक्त सहविचार बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीला राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी तसेच महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. (Maharashtra Board)
https://prahaar.in/2026/06/04/crime-against-13-employees-including-teachers-in-jalgaon/
परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका केंद्रांवर :
सर्व परीक्षा केंद्रांना डिजिटल सुविधा :
या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षण मंडळाने स्वीकारली आहे. यामध्ये संगणक, उच्च क्षमतेचे प्रिंटर, सुरक्षित सॉफ्टवेअर, इंटरनेट आणि वाय-फाय सुविधा यांचा समावेश असेल. तसेच प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेसाठी विशेष सुरक्षा प्रणाली, पासवर्ड संरक्षित फाईल्स आणि वेळेवर सक्रिय होणारी डिजिटल यंत्रणा वापरण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Maharashtra Board)
https://prahaar.in/2026/06/04/watch-iafs-sukhoi-su-30mki-lands-at-navi-mumbai-international-airport-for-first-time-netizens-call-it-a-historic-moment/
प्रश्नपत्रिका गळतीला आळा बसणार?
पर्यावरणपूरक उपक्रमालाही चालना :
दरवर्षी लाखो प्रश्नपत्रिकांच्या छपाईसाठी मोठ्या प्रमाणात कागद, वाहतूक आणि मनुष्यबळ खर्च केला जातो. डिजिटल पद्धतीमुळे या प्रक्रियेत मोठी बचत होण्याची शक्यता असून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही मदत होईल. त्यामुळे हा निर्णय पर्यावरणपूरक प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे. (Maharashtra Board)
https://prahaar.in/2026/06/04/cid-takes-major-action-in-pune-toxic-liquor-case-chemical-supplier-father-son-arrested/
लाखो विद्यार्थ्यांवर होणार परिणाम :
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. राज्यभरातील हजारो परीक्षा केंद्रांमध्ये ही नवी व्यवस्था लागू होणार असल्याने परीक्षा व्यवस्थापनात मोठा बदल होणार आहे. मंडळाकडून या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक तयारी आणि प्रशिक्षण प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून आगामी परीक्षांमध्ये डिजिटल युगाची नवी सुरुवात पाहायला मिळणार आहे. (Maharashtra Board)