Home ब्रेकिंग न्यूज Jay Pawar and Vikram Kakade : विधानपरिषद उमेदवार विक्रम काकडेंकडून जय पवारांना १० कोटींचे कर्ज

Jay Pawar and Vikram Kakade : विधानपरिषद उमेदवार विक्रम काकडेंकडून जय पवारांना १० कोटींचे कर्ज

0
Jay Pawar and Vikram Kakade : विधानपरिषद उमेदवार विक्रम काकडेंकडून जय पवारांना १० कोटींचे कर्ज
Jay Pawar And Vikram Kakade

शपथपत्रातून माहिती समोर; नावावर तब्बल १५० कोटींची संपत्ती

मुंबई : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार आणि माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांच्या नावावर तब्बल १५३ कोटी रुपयांची मालमत्ता असून, त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र जय पवार (Jay Pawar) यांना १० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या मालमत्ता प्रतिज्ञापत्रातून (शपथपत्र) ही माहिती समोर आली आहे. याशिवाय त्यांनी रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रँट यांच्यासह काही कंपन्यांना एकूण ४० कोटी ९४ लाख रुपयांची रक्कम कर्ज स्वरूपात दिल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले आहे.

https://prahaar.in/2026/06/04/ahilyadeviholkaryojana/

शपथपत्रानुसार, विक्रम काकडे (Vikram Kakade) यांच्या नावे १५३ कोटी २ लाख ७५ हजार २५६ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असून, ४० कोटी ९४ लाख रुपयांचे कर्ज (Loan) थकीत आहे. बांधकाम व्यावसायिक असलेल्या काकडे यांच्याकडे पुणे शहरातील विविध भागांत अलिशान बंगले आणि मोकळे भूखंड आहेत. विशेष म्हणजे, दुबई येथे सुमारे ७ कोटी ६६ लाख ६६ हजार ७२५ रुपये किमतीचा १ हजार ५५० चौरस फुटांचा आलिशान बंगला त्यांच्या नावावर असल्याचे विवरण त्यांनी दिले आहे. त्यांच्याकडे ७ लाख ५० हजार रुपये रोख असून, विविध बँकांमधील बचत खाते, बाँड, शेअर्स, पोस्टल खाते, शस्त्र आणि इतर चल संपत्ती मिळून ७८ कोटी ९५ लाख ६५ हजार ५३१ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

https://prahaar.in/2026/06/04/solar-and-lunar-eclipses-in-the-same-month-rare-astronomical-combination-in-august-2026/

कोट्यवधींचे भूखंड, पत्नीकडे ९ कोटींचा बंगला

मावळ तालुक्यात सध्याच्या बाजारमूल्यानुसार (रेडीरेकनर) अनुक्रमे ४७ कोटी ७८ लाख २१ हजार रुपयांचा आणि १ कोटी २९ लाख १६ हजार रुपयांचे दोन मोकळे भूखंड त्यांच्या मालकीचे आहेत. याशिवाय मुंढवा येथे ८ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचा मोकळा भूखंड आणि पाषाण येथे ४ हजार ४४४ चौरस फुटांची सदनिका आहे. विशेष म्हणजे, पाषाण येथीलच ९ कोटी १९ लाख ५६ हजार रुपये किमतीचा एक आलिशान बंगला त्यांनी आपल्या पत्नीला बक्षीस (गिफ्ट डीड)(Gift Deed) म्हणून दिल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. १२ वी उत्तीर्ण असलेल्या विक्रम काकडे यांच्या नावावर दोन गुन्हे दाखल असून, ९९ लाख ८१ हजार ४९८ रुपयांचा प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) (Income Tax) भरणे अद्याप बाकी असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here