जयपूर : पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरमध्ये एका मोठ्या कंपनीत धक्कादायक घटना घडली. AI च्या मदतीने फेक फोटो आणि व्हिडीओ दाखवून सोशल मीडियाद्वारे व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले. नंतर त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ९० लाख रुपये उकळण्यात आले. यासाठी AI द्वारेच व्यावसायिकाचे बनावट फोटो आणि व्हिडीओ तयार करून त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. व्यावसायिकाच्या प्रकल्पांचे नियंत्रण मिळवण्याचाही प्रयत्न झाला.
https://prahaar.in/2026/05/29/from-june-1-the-pockets-of-the-common-man-will-be-affected-from-lpg-atm-to-pan-these-7-big-rules-will-change/
प्रेयसीच्या मागण्या संपत नसल्याचे बघून वैतागलेल्या व्यावसायिकाने थेट पोलिसांत धाव घेतली. महेश नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी व्यावसायिकाने दिलेल्या माहितीआधारे तपास केला आणि AI चा वापर करून फसवणूक करणाऱ्या महिलेचे बिंग फुटले.
https://prahaar.in/2026/05/29/nashik-crime-fraud-of-rs-60-lakhs-by-luring-in-stock-marketing/
दक्षिण विभागाचे डीसीपी राजर्षि वर्मा यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या मदतीनं कारवाई करत आरोपी महिलेला जोधपूरहून अटक केली. पोलिसांकडून तिची चौकशी सुरू आहे. तिच्या नेटवर्कमध्ये आणखी किती जण आहेत, ते कुठे आहेत, याचा शोध घेतला जात आहे. गुन्ह्यासाठी AI चा वापर कसा केला जात होता, पैसे कशा प्रकारे उकळले जात होते; ही मोडस ऑपरेंडी पोलिसांनी चौकशीतून जाणून घेतली आहे. आता पुढील तपास सुरू आहे. व्यावसायिकाकडून उकळलेल्या पैशांचे काय केले याची चौकशी सुरू आहे. फसवणूक प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.