Home साप्ताहिक 'ती'ची गोष्ट Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

0
Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ
Lazy Pallu

एकेकाळी साडीचा पदर अगदी चापून-चोपून, नीट प्लेट्स घालून पिनअप करणं हीच एलिगंट फॅशन मानली जायची. पण बदलत्या ट्रेंडसोबत आता साडी ड्रेपिंगमध्येही मोठे बदल दिसू लागले आहेत. हल्ली फॅशनमध्ये परफेक्टपेक्षा कम्फर्ट आणि फ्लोई लूकला अधिक पसंती दिली जात आहे. याच कारणामुळे सध्या सोशल मीडियावर आणि सेलिब्रिटी लुक्समध्ये “लेझी पल्लू” स्टाईलची जोरदार क्रेझ पाहायला मिळते.

https://prahaar.in/2026/05/26/kajuli-biswas-a-story-of-struggle-and-selfless-service-kajuli-biswas/

उन्हाळ्यात जड साड्या किंवा खूप पिनअप केलेला पदर सांभाळणं अनेक महिलांना त्रासदायक वाटतं. अशावेळी लेझी पल्लू स्टाईल खूप आरामदायी ठरते. यामुळे साडी हलकी वाटते. पदर वारंवार सावरण्याची गरज पडत नाही. लूक अधिक नैसर्गिक दिसतो तर फोटो आणि रील्समध्येही फ्लोई इफेक्ट मिळतो. म्हणूनच आजकाल अनेक अभिनेत्री, फॅशन इन्फ्लुएन्सर्स आणि साडी लव्हर्स या स्टाईलकडे वळताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, ही स्टाईल दिसायला अगदी सरळ आणि साधी वाटत असली तरी ती साडीला एकदम क्लासी, मॉडर्न लुक देते. त्यामुळे अनेक महिला आता पारंपरिक पिनअप पल्लूऐवजी लेझी पल्लू स्टाईल ट्राय करताना दिसत आहेत.

https://prahaar.in/2026/05/26/abhilasha-barak-major-abhilasha-barak-awarded-military-gender-advocate-of-the-year-award/

लेझी पल्लू म्हणजे साडीचा पदर अगदी घट्ट आणि व्यवस्थित प्लेट्समध्ये न घेता, थोडासा सैल, फ्लोई आणि नॅचरल पद्धतीने कॅरी करणे. या स्टाईलमध्ये पदराला फक्त एक-दोन हलक्या प्लेट्स घालून तो खांद्यावर सहज सोडला जातो. यामध्ये जास्त पिनअप किंवा परफेक्ट फोल्ड्स नसतात. त्यामुळे लूक थोडासा रिलॅक्स, स्टायलिश आणि मॉडर्न दिसतो. विशेषतः कॉटन, लिनन, मलमल, कॉटन सिल्क आणि ऑर्गेन्झा साड्यांवर ही स्टाईल खूप सुंदर दिसते.

https://prahaar.in/2026/05/26/childrens-drama-days/

लेझी पल्लू स्टाईल करताना खूप जाड प्लेट्स करू नका, पदर पूर्णपणे सैलही सोडू नका, मिनिमल ज्वेलरी निवडा, स्लीव्हलेस किंवा डीप नेक ब्लाऊजवर हा लूक जास्त उठून दिसतो आणि मेकअप मिनिमल ठेवा. सध्या तरी अगदी जास्त तयारी केल्यासारखं न वाटता स्टायलिश दिसणाऱ्या या फॅशनला लोकांची पसंती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here