नाशिक : मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक परिस्थीवर मात करत पंचवटीतील एका १० विच्या विद्यार्थिनीने घवघवीत यश मिळवले आहे. प्रवास खडतर असला तरी मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते हे श्रावणीने दाखवून दिले आहे. श्रावणी हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल १०० टक्के गुण मिळवत यशाचे शिखर गाठले आहे. सध्या सर्वच स्तरातुन तिचे कौतुक होत आहे. (SSC Exam Result 2026)
मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social media platforms) वापर करून पुराव्यांविना केली जाणारी बदनामी (Defamation) आणि त्यातून निर्माण होणारे गंभीर सामाजिक प्रश्न विचारात ...
१०० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन
पंचवटीतील मेरी म्हसरूळ परिसरातील रहिवासी आणि सीडीओ मेरी शाळेची विद्यार्थिनी श्रावणी महेश नांदुर्डीकर या विद्यार्थिनीने दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे कोणतीही शिकवणी न लावता तिने हे यश मिळवले आहे. श्रावणी हिचे वडील पेपर विक्रेते असून त्यांची परिस्थिती ही बेताचीच आहे. मात्र परिस्थितीला कारण न बनवता तिने मेहनत घेतली, आणि मोठे यश मिळवले. तिच्या या यशाचा आई वडिलांना सार्थ अभिमान असून यशामुळे ते ही भारावून गेले.
जिद्द, संयम, चिकाटी आणि बेताची आर्थिक परिस्थिती असूनही श्रावणीने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रावणीने सांगितले की सातत्यपूर्ण अभ्यास, आई-वडील आणि गुरुजनांचा आशीर्वाद तसेच सहकार्यामुळे हे यश मिळवता आले. पुढे १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन इंजिनिअरिंग करण्याचा तिचा मानस आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ ज्ञानार्जनासाठी करावा, असे आवाहनही तिने केले आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम राखला ...
नाशिक विभाग पाचव्या स्थानावर
आज शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. नाशिक विभागाने ९०.५३ टक्के निकालासह राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे. नाशिक विभागातून एकूण २०१९४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २०००९६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधून १८११५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ६४००७ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी (७५ टक्क्यांपेक्षा अधिक) गुण मिळवले आहेत. तर ६६४०३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (६० टक्क्यांपेक्षा अधिक) आणि १०,२१८ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी (३५ टक्क्यांपेक्षा अधिक) प्राप्त केली आहे. (SSC Exam Result 2026)
दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी
मुलींची टक्केवारी ९४.९६ टक्के
मुलांची टक्केवारी: ९०.५६ टक्के
मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांची ९०.५६ टक्केवारी






