Home ब्रेकिंग न्यूज ED Summons Pratibha Chakankar : खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स; आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू

ED Summons Pratibha Chakankar : खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स; आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू

0
ED Summons Pratibha Chakankar : खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स; आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू
pratibha chakankar

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असून तपास अधिकच गडद होत चालला आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या या प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहाराचाही मोठा मुद्दा पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) यांना सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ED ने समन्स बजावले आहेत.

२ कोटी ४० लाख रुपयांची आर्थिक हालचाल झाल्याचा संशय :

तपासादरम्यान, समता पतसंस्थेतील काही खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल झाल्याचे उघड झाले आहे. या खात्यांचा संबंध प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांशी जोडला जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस तपासानुसार, या खात्यांमधून सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांची आर्थिक हालचाल झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या खात्यांमध्ये अशोक खरात याचे नाव नॉमिनी म्हणून नोंदवलेले असल्याचेही समोर आले आहे.

https://prahaar.in/2026/05/02/breaking-news-shocking-4-year-old-girl-brutally-murdered-angry-villagers-take-to-the-streets/

आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी होणार :

या सर्व पार्श्वभूमीवर, ED कडून प्रतिभा चाकणकर यांना मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी होणार आहे. या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्रतिभा चाकणकर यांनी यापूर्वी सर्व आरोप फेटाळले असून, आपल्या नावाने बनावट खाती उघडण्यात आल्याचा दावा केला होता. याआधी शिर्डी पोलिसांनी त्यांची आणि त्यांच्या मुलाची तासन्‌तास चौकशी करून पैशांचा स्रोत आणि अशोक खरात यांच्याशी असलेले संबंध तपासण्याचा प्रयत्न केला होता.

https://prahaar.in/2026/05/02/property-tax-penalty-on-arrears-reduced-from-2-to-1-percent/

काही मोठे खुलासे होण्याची शक्यता :

या प्रकरणामुळे आधीच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, रुपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ED च्या कारवाईमुळे या प्रकरणाला आणखी वेग आला असून, पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.