मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर आणि मगराहत पश्चिम विधानसभा मतदारसंघांतील एकूण १५ मतदान केंद्रांवर आज (शनिवार, २ मे) सकाळी ७ वाजल्यापासून फेरमतदानाला सुरुवात झाली आहे. २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानावेळी गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली.
सर्वात मोठा वाद फाल्टा विधानसभा मतदारसंघात उभा राहिला. येथे एका मतदान केंद्रावर ईव्हीएमवरील कमळ चिन्ह (भाजप) तसेच सीपीएम उमेदवाराच्या नावासमोरील बटण टेप लावून झाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. फाल्टा येथील आणखी ३० केंद्रांवर फेरमतदान घ्यायचे की नाही, याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
https://prahaar.in/2026/05/02/ed-summons-pratibha-chakankar-big-action-in-kharat-case-ed-summons-pratibha-chakankar-in-depth-investigation-into-financial-transactions-begins/
२९ एप्रिल रोजी पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ आणि वाद निर्माण झाले होते. मतदारांना उमेदवारांची नावे दिसू नयेत म्हणून जाणीवपूर्वक बटणे झाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम ५८(२) अंतर्गत मतदान रद्द करण्याचा अधिकार वापरला आहे.
https://prahaar.in/2026/05/01/harbhajan-singh-issues-notice-to-punjab-government/
या संपूर्ण प्रकरणामुळे बंगालमधील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले असून, आगामी निकालांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.