मुंबई : राज्यात सध्या उष्णतेचा कडाका शिगेला पोहोचला असून विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली यांसारख्या भागांमध्ये उष्णतेने अक्षरशः कहर केला आहे. देशातील टॉप १० उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश झाल्याने परिस्थितीची तीव्रता स्पष्ट होते. नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Weather Update)
https://prahaar.in/2026/04/30/summer-special-trains-responding-to-passenger-demand-two-additional-summer-special-trains-between-mumbai-and-madgaon-from-ltt/
दरम्यान, उष्णतेने त्रस्त नागरिकांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांमध्ये तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार, तापमान ३८ ते ४० अंशांच्या दरम्यान राहू शकते. मात्र, ही घट मर्यादित आणि तात्पुरती असू शकते, त्यामुळे निष्काळजीपणा करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.
पण या दिलास्यानंतर आता नव्या संकटाची चाहूल लागली आहे. हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भात पुढील २४ तास उष्णतेची लाट कायम राहणार असली तरी त्यानंतर २ मेपासून वातावरणात बदल होऊन वादळी पावसाची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Weather Update)
https://prahaar.in/2026/04/30/bank-of-baroda-launch-of-indian-sign-language-assistance-service-at-bank-of-barodas-contact-centre/
https://prahaar.in/2026/04/30/nashik-45-thousand-names-in-nashik-district-have-been-removed-from-the-ration-card-list-is-your-name-also-not-on-the-list/
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले की, “राज्यातील बहुतांश भागात तापमान ४० अंशांच्या आसपासच राहील. मात्र वातावरणातील आर्द्रता आणि वाऱ्याच्या बदलामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.” त्यांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांपासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. (Weather Update)
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा
भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा
हलके, सैल आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करा
विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या जागेत थांबू नका
अधिकृत हवामान अपडेट्सवरच विश्वास ठेवा
एकंदरीत, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून उष्णतेनंतर अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे. (Weather Update)