मुंबई : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा २०२६ चा निकाल उद्या म्हणजेच शनिवार २ मे रोजी जाहीर होणार आहे. सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडेल, त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
मंडळाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, विद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in, mahahsscboard.in आणि इतर अधिकृत संकेतस्थळांवर तपासू शकतात. निकाल पाहण्यासाठी सीट नंबर आणि आईचे नाव आवश्यक असेल. (HSC Results 2026)
https://prahaar.in/2026/05/01/weather-update-next-48-hours-very-important-relief-from-heat-but-new-crisis-of-unseasonal-weather-at-the-door-imds-high-alert/
निकाल पाहण्यासाठी प्रमुख संकेतस्थळे:
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनाची सुविधा :
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल, त्यांच्यासाठी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी ३ मे ते १७ मे २०२६ दरम्यान अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. (HSC Results 2026)
https://prahaar.in/2026/04/30/rajnath-singh-india-ready-for-long-stick-against-pakistan-rajnath-singh/
१४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार :
यंदा सुमारे १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली असून निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व प्रवेश प्रक्रियेसाठी गुणपत्रिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. (HSC Results 2026)
एकूणच, उद्या दुपारी १ वाजता राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा महत्त्वाचा टप्पा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि तणाव दोन्हीही शिगेला पोहोचले आहेत. (HSC Results 2026)