Home ताज्या घडामोडी Dalimb Movie: दोन रहस्यं, एक थरारक तपास! ‘डाळिंब’मध्ये जितेंद्र कुमार आणि प्रिया बापटची दमदार जोडी

Dalimb Movie: दोन रहस्यं, एक थरारक तपास! ‘डाळिंब’मध्ये जितेंद्र कुमार आणि प्रिया बापटची दमदार जोडी

0
Dalimb Movie: दोन रहस्यं, एक थरारक तपास! ‘डाळिंब’मध्ये जितेंद्र कुमार आणि प्रिया बापटची दमदार जोडी
Photo: Prahaar

Dalimb Movie: विविध शैलींमधील दर्जेदार कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची परंपरा कायम ठेवत, हिंदी ZEE5 ने आपल्या आगामी ओरिजिनल फीचर फिल्म डाळिंबचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा एक पकड घेणारा आणि अंगावर काटा आणणारा सायकोलॉजिकल थ्रिलर आहे, जो शेवटपर्यंत प्रेक्षकांना अंदाज बांधायला लावतो. एलिप्सिस एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटात जितेंद्र कुमार एका कधीही न पाहिलेल्या भूमिकेत तर प्रिया बापट पोलीस अधिकारीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कथा दोन अस्वस्थ करणाऱ्या रहस्यांभोवती फिरते – एक बेपत्ता मूल आणि मानसिक रुग्णालयातून पळालेला एक माणूस, ज्यामुळे वेळेविरुद्धची एक थरारक शर्यत सुरू होते. 4 डिसेंबर 2026 रोजी केवळ हिंदी ZEE5 वर डाळिंब प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचा ट्रेलर पाहता, मुंबईच्या उपनगरीय, मध्यमवर्गीय पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट ओळखीच्या परिसरात दडलेल्या वास्तवाचा वेध घेतो. वरवर सामान्य दिसणाऱ्या भिंतींमागे लपलेली आणि धक्कादायक आयुष्ये, रहस्ये आणि कथा आहेत, जी समजुतींना तडा देतात. तपास जसा पुढे जातो, तसे आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल आपल्याला किती कमी माहिती आहे, हे उलगडत जाते, असा ट्रेलर मधून दिसत आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाचे अस्वस्थ करणारे वातावरण आणि भावनिक खोली दिसून येते, जिथे भीती, प्रेम, नुकसान आणि अनिश्चितता अनपेक्षित पद्धतीने एकत्र येतात.

https://www.prahaar.in/2026/11/25/target-of-100-billion-investment-in-the-infrastructure-sector-in-maharashtra-over-the-next-five-years-chief-minister-devendra-fadnavis/

डाळिंब चित्रपटाची कथा कशाबद्दल आहे?

डाळिंबच्या केंद्रस्थानी दोन अस्वस्थ करणारी रहस्ये आहेत एक बेपत्ता मूल आणि पळालेला एक मानसिक रुग्ण. हा चित्रपट प्रेक्षकांना लपलेल्या आयुष्यांच्या, तुटलेल्या नात्यांच्या आणि दडलेल्या रहस्यांच्या जाळ्यात ओढतो. दोन्ही रहस्ये जशी उलगडू लागतात, तसे सुरुवातीला साधे वाटणारे प्रकरण अधिकाधिक अस्वस्थ करणारे रूप धारण करते, ज्यामुळे आकलन आणि वास्तव यातील सीमारेषा पुसट होतात. भीती, प्रेम आणि नुकसान हे भावनिक केंद्र असलेला डाळिंब, सामान्य आयुष्यांच्या पृष्ठभागाखाली किती काही दडलेले असू शकते, याचा शोध घेतो.

डाळिंब चित्रपट इतर चित्रपटांच्या तुलनेत वेगळा का ठरतो तर, पकड घेणारे दुहेरी रहस्य, बेपत्ता मूल आणि पळालेला मानसिक रुग्ण एका अस्वस्थ करणाऱ्या तपासात एकत्र येतात, ज्यामुळे एक अनपेक्षित तरीही भावनिकदृष्ट्या भारावून टाकणारी कथा साकार होते. विचार करायला लावणारे सिनेमा, केवळ पारंपरिक सस्पेन्सच्या पलीकडे जाऊन “डाळिंब” समजुतींना आव्हान देतो, प्रेक्षकांना अस्वस्थ करतो आणि कथा संपल्यानंतरही बराच वेळ विचारात ठेवतो.

तसेच हा चित्रपट ओळखीच्या जागांमागे दडलेल्या वास्तवाचा शोध घेतो आणि आपल्या आजूबाजूचे जग आपल्याला खरोखर किती माहिती आहे, यावर प्रश्न उपस्थित करतो. शिवाय, जितेंद्र कुमार आणि प्रिया बापट यांना कधीही न पाहिलेल्या भूमिकांमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत, ज्यामुळे या स्तर असलेल्या आणि सस्पेन्सने भरलेल्या कथेला त्यांच्या अभिनयाची जोड मिळाली आहे.

यावर अभिनेता जितेंद्र कुमार म्हणाला “डाळिंबकडे मला आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्याची रंजक संकल्पना आणि कथा जशी पुढे जाते तसे उलगडणारे अनेक स्तर. हा असा चित्रपट आहे, जो तुम्हाला तुम्हाला काय माहिती आहे, यावर प्रश्न विचारायला लावतो आणि पात्रे व त्यांची परिस्थिती याबद्दलची तुमची समज सतत आव्हान देतो. माझे पात्र साकारणे हा एक रंजक अनुभव होता, कारण कथेला पुढे नेणाऱ्या सस्पेन्समध्ये भावनिकदृष्ट्या खूप काही शोधण्यासारखे होते. प्रिया अवेन, प्रिया बापट आणि संपूर्ण टीमसोबत काम करणे हा प्रवास विशेषतः फलदायी ठरला. डाळिंब प्रेक्षक पाहतील आणि त्याचे रहस्य उलगडतील, यासाठी मी उत्सुक आहे.

तर अभिनेत्री प्रिया बापटने सांगितले, “डाळिंबमध्ये मला रंजक वाटलेली गोष्ट म्हणजे कथा ज्या पद्धतीने सस्पेन्स आणि खोलवर मानवी भावना एकत्र आणते. हे केवळ रहस्य सोडवण्याबद्दल नाही, तर त्याभोवतीची माणसे आणि परिस्थिती समजून घेण्याबद्दलही आहे. माझ्या पात्राचे अनेक स्तर आहेत आणि सायकोलॉजिकल थ्रिलरचा भाग असताना त्या भावनांचा शोध घेणे हा एक रोमांचक अनुभव होता. प्रिया अवेन, जितेंद्र कुमार आणि संपूर्ण टीमसोबत काम केल्याने हा अनुभव आणखी खास झाला. प्रेक्षक डाळिंब पाहतील आणि कथेत असलेली अनेक वळणे शोधतील, यासाठी मी उत्सुक आहे, जो केवळ हिंदी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here