Home देश ‘तुमच्या चाचा आझम खान यांना फक्त जामीन मिळालाय…’ केशव प्रसाद मौर्य यांचा अखिलेश यादवांवर जोरदार हल्ला!

‘तुमच्या चाचा आझम खान यांना फक्त जामीन मिळालाय…’ केशव प्रसाद मौर्य यांचा अखिलेश यादवांवर जोरदार हल्ला!

0
‘तुमच्या चाचा आझम खान यांना फक्त जामीन मिळालाय…’ केशव प्रसाद मौर्य यांचा अखिलेश यादवांवर जोरदार हल्ला!
केशव प्रसाद मौर्य यांचा अखिलेश यादवांवर जोरदार हल्ला

लखनऊ : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. आझम खान तुरुंगातून बाहेर आल्यानंतर समाजवादी पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असताना भाजपने या मुद्द्यावरून सपाला लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधत आझम खान यांच्या जामिनावरून राजकीय टोलेबाजी केली.

केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर पोस्ट करत समाजवादी पक्षाच्या राजकारणावर टीका केली. अखिलेश यादव यांना कदाचित स्मरणशक्तीचा त्रास होत असेल, त्यामुळे उत्तर प्रदेशातील जनता समाजवादी पक्षाच्या काळातील कथित कारभार विसरलेली नाही, याची आठवण करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. रामभक्तांवरील गोळीबार, दंगली, गुन्हेगारांना संरक्षण, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, जातिवाद आणि घराणेशाहीच्या राजकारणावरून त्यांनी सपावर आरोप केले.

आझम खान यांचाही उल्लेख करत मौर्य यांनी त्यांच्यावर गंभीर आरोपांचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले. जौहर विद्यापीठाच्या नावाखाली जमीन बळकावल्याचे आरोप, भ्रष्टाचार आणि विविध वादग्रस्त वक्तव्यांचा संदर्भ देत आझम खान यांचे राजकीय समर्थन करणाऱ्यांना जनता जाब विचारेल, असा दावा त्यांनी केला.

https://www.prahaar.in/2026/11/18/the-future-will-remain-secure-only-if-the-past-is-remembered-chief-minister-yogi-adityanaths-detailed-explanation-regarding-the-batenge-toh-katenge-if-di/

‘अखिलेश जी, तुमच्या चाचा आझम खान यांना फक्त जामीन मिळाला आहे, आरोपांतून निर्दोष मुक्तता झालेली नाही. जामीन म्हणजे निर्दोषत्व नव्हे,’ अशा शब्दांत केशव प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यादव यांना सुनावले. उत्तर प्रदेशातील जनता गुंडाराज, तुष्टीकरण, भ्रष्टाचार आणि घराणेशाही पुन्हा स्वीकारणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मौर्य यांनी 2027 मध्ये उत्तर प्रदेशात सलग 3 वेळा भाजप सरकार स्थापन करण्याचा संकल्प कायम असल्याचे सांगितले.

माध्यमांशी बोलतानाही त्यांनी आझम खान यांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिली. न्यायालयाने जामीन दिल्याबाबत भाजपला आक्षेप नसल्याचे सांगत, उत्तर प्रदेशात दंगली आणि गुंडगिरीला स्थान दिले जाणार नाही, तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आझम खान यांच्या जामिनानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here