Home क्राईम Harishchandragad : हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला; ब्लॅकमेलिंगच्या दाव्यामुळे गूढ वाढले

Harishchandragad : हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला; ब्लॅकमेलिंगच्या दाव्यामुळे गूढ वाढले

0
Harishchandragad : हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला; ब्लॅकमेलिंगच्या दाव्यामुळे गूढ वाढले

Maharashtra News: महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि ट्रेकर्सचे आकर्षण असलेल्या हरिश्चंद्रगडावर पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. कोकणकड्याच्या खोल दरीत राजस्थानमधील 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. खुशाल चेनाराम प्रजापती असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने कुटुंबीयांशी फोनवर बोलताना कोणीतरी ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/19/former-shiv-sena-mla-srinivas-vanga-joins-bjp-inducted-in-presence-of-state-president-ravindra-chavan/

राजूर येथे कुटुंबीयांशी साधला होता संपर्क

मिळालेल्या माहितीनुसार, खुशाल प्रजापती हा मुंबई-इगतपुरीमार्गे प्रवास करत शनिवारी दुपारी राजूर येथे पोहोचला होता. तेथील एका हॉटेलचालकाच्या फोनवरून त्याने आई-वडिलांशी संपर्क साधला. यावेळी कोणीतरी आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानंतर तो खासगी वाहनाने पुढे गेला.

मात्र, त्यानंतर खुशालचा फोन आला नाही आणि त्याच्याशी संपर्कही होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.

कोकणकड्याच्या दरीत मृतदेह आढळला

हरिश्चंद्रगडावरील वन कर्मचाऱ्यांना कोकणकड्याच्या खोल दरीत एक मृतदेह दिसला. त्यांनी याची माहिती राजूर पोलिसांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. लोणावळ्यातील अनुभवी ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.

खुशालला कोण ब्लॅकमेल करत होते? त्याचा हरिश्चंद्रगडावर जाण्यामागील नेमका उद्देश काय होता? त्याचा मृत्यू कशामुळे झाला? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हरिश्चंद्रगडावरील पूर्वीच्या घटनांमुळे चिंता

हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा ट्रेकर्समध्ये विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, या परिसरात यापूर्वीही बेपत्ता पर्यटक आणि मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. सुमारे सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता पर्यटकाचा शोध घेताना कोकणकड्याच्या खोल दरीत सिल्वासा येथील रोहित सोळुंके आणि लातूर येथील गणेश होनराव या तरुणांचे सांगाडे आढळल्याची माहिती समोर आली होती.

कोकणकड्याच्या परिसरात सुरक्षेसाठी ग्रील लावण्यात आले असतानाही काही पर्यटक पुढे जाऊन कड्याच्या टोकावर बसण्याचा किंवा फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारांमुळे जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे ट्रेकिंग करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here