चेन्नई सुपर किंग्सने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, त्यांचे दिग्गज माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२७ च्या संघाचे मार्गदर्शक (मेंटर) म्हणून जबाबदारी स्वीकारतील. फ्रँचायझीने या घडामोडीला दुजोरा दिला असून, अनेक वर्षे संघाला यशाच्या शिखरावर नेल्यानंतर, आता धोनी एका नवीन भूमिकेत सुपर किंग्सच्या प्रवासाचा भाग राहतील, असे म्हटले आहे. सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य आधारस्तंभ राहिलेले धोनी या फ्रँचायझीशी घट्ट जोडलेले आहेत. त्यांनी संघाला अनेक आयपीएल जेतेपदे मिळवून दिली आहेत.
OFFICIAL ANNOUNCEMENT 🦁💛
A once-in-a-lifetime player.
A new role. A bond that lasts forever 💛
Mahendra Singh Dhoni takes charge as the Team Mentor of Chennai Super Kings!
Through countless victories, challenging times, and memories that will stay in our hearts forever, MS has been at the heart of our journey from the very beginning.
From leading us to glory to guiding the next generation of Super Kings, Thala will always be a part of our identity. And Chennai will always be his home.
Read more : https://t.co/YKsoHYE51A
#WhistlePodu
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 17, 2026
“एम. एस. धोनीशिवाय सीएसके (CSK) असूच शकत नाही,” असे सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. “गेल्या जवळपास दोन दशकांपासून आम्ही एकमेकांच्या सोबतीने वाटचाल केली आहे आणि प्रगती केली आहे. यात यश, अपयश आणि त्या दरम्यानचे सर्व चढ-उतार समाविष्ट आहेत. आमचे नाते इतके घट्ट असण्यामागे एकच कारण आहे, आम्ही एकमेकांच्या हेतूंवर कधीही शंका घेत नाही. याच विश्वासाने हा प्रवास शक्य केला. २००८ मध्ये, मी आग्रह धरला होता की धोनी सीएसकेचा भाग असावा. आज मागे वळून पाहताना जाणवते की, तो माझा सर्वोत्तम निर्णय होता. केवळ त्याच्या कामगिरीमुळे नव्हे, तर तो माणूस म्हणून किती उत्तम आहे, म्हणून!” अशी भावना त्यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे.
धोनीची आयपीएल कारकीर्द
एम.एस. धोनीने आपल्या आयपीएल कारकिर्दीत २७८ सामने खेळून २४२ डावांमध्ये ५४३९ धावा केल्या. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी ३८.३० आणि स्ट्राइक रेट १३७.४५ होता. त्याने २४ अर्धशतके झळकावली. त्याने ३७५ चौकार आणि २६४ षटकार मारले. धोनीचे कौशल्य केवळ त्याच्या फालंदाजीपुरते मर्यादित नव्हते तर त्याने यष्टीमागेही आपली छाप सोडली. आपल्या आयपीएल कारकिर्दीत त्याने १५८ झेल घेतले आणि ४७ फलंदाजांना यष्टीचीत केले. आता एक खेळाडू म्हणून त्याची आयपीएल कारकीर्द संपली असून तो चेन्नई सुपर किंग्सचा मार्गदर्शक म्हणून एक नवीन भूमिका स्वीकारणार आहे.
धोनी सीएसकेचा सर्वात यशस्वी कर्णधार
धोनीने २००८ ते २०२५ या काळात चेन्नई सुपर किंग्सचे एकूण २४४ टी२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले. यापैकी सीएसकेने १४५ सामने जिंकले, तर ९६ सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला. एक सामना बरोबरीत सुटला आणि दोन सामन्यांचा निकाल अनिर्णित राहिला. धोनीच्या कर्णधारपदाखाली सीएसकेची विजयाची टक्केवारी ५९.४२ होती. धोनीने आपल्या कर्णधारपदाखाली चेन्नईला पाच वेळा आयपीएल चॅम्पियनही बनवले.