Nirmal Singh Ji Maharaj: अध्यात्मिक गुरू निर्मल सिंह जी महाराज (छतरपुर वाले गुरुजी) यांच्या महासत्संगातील बॉलिवूड सेलिब्रिटींचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात अनेक कलाकार भक्तीत तल्लीन होऊन भावुक झालेले पाहायला मिळाले. १६ नोव्हेंबर रोजी, गुरुजींचा (निर्मल सिंह जी महाराज) वार्षिक महासत्संग मुंबईत मोठ्या आदराने आणि भक्तीभावाने पार पडला. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक प्रमुख व्यक्तींनी या विशेष प्रसंगाला हजेरी लावली.
यावेळी निर्मल सिंह जी महाराज्यांच्या दरबारात सेलिब्रिटींना दुःखाने अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. एका चित्रात चाहत खन्ना अश्रू ढाळताना दिसल्या, तर चित्रात नील नितीन मुकेश भक्तांना प्रसाद वाटताना दिसले, तसेच भूमी पेडणेकर, हिमेश रेशमिया देखील भावुक होताना दिसले.
https://www.prahaar.in/2026/11/17/painjan-song-a-love-story-unfolds-to-the-sound-of-anklets-a-new-pairing-of-akshay-waghmare-and-ruchira-jadhav/
महासत्संगाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर एका सुंदर जांभळ्या रंगाच्या पारंपरिक लूकमध्ये दिसली. यात तिने भक्तीभावाने गुरुजींची आरती केली. त्यानंतर, हात जोडून प्रार्थनेत मग्न झाली. तिच्या चेहऱ्यावर भक्ती आणि शांती स्पष्टपणे दिसत होती.
View this post on Instagram
तर हिमेश रेशमिया देखील आपल्या पत्नीसोबत बसलेले दिसले. हात जोडून ते भक्तीमध्ये मग्न झालेले यावेळी ते किती भावुक होत आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरून समजत होते. दरम्यान, आणखी एका व्हिडिओने लोकांची मने हेलावली. त्यामध्ये टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना डोळे मिटून आणि हात जोडून गुरुजींची प्रार्थना करताना दिसत होती. ती इतकी भावुक झाली की तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तसेच अभिनेता नील नितीन मुकेश देखील सेवा करताना दिसला. तो महासत्संगात उपस्थित असलेल्या भक्तांना स्वतः प्रसाद वाटत होता. त्याची ही कृतीदेखील लक्ष वेधून घेत आहे.
😭😭 https://t.co/wR3TOEb76w
— shivambanga (@shivambanga) November 17, 2026
गुरुजींच्या दरबारात यांच्याशिवाय मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवरांनीही हजेरी लावली. भूषण कुमार, सेलिना जेटली, गुनीत मोंगा, ललित पंडित, रोहन गंडोत्रा, सोनाली सहगल, साहिल सलाथिया, पूजा चोप्रा, राय लक्ष्मी, गुरप्रीत कौर चड्ढा, सिद्धार्थ सिब्बल, सरगम सिंग, रश्मी आर्य, ऋषभ साहनी आणि मोसेस सिंग या स्टार्सचा यामध्ये समावेश होता. सर्वांनी हात जोडून त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली. या महासत्संगात केवळ कलाकारांच्या उपस्थितीमुळेच नव्हे, तर श्रद्धा, सेवा, भक्ती आणि सर्वांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या भावनांनी भरलेल्या त्या विशेष क्षणांमुळेही चर्चेत राहिला.