Home महाराष्ट्र ठाणे Sanjay Kelkar Jan Sanvad: SRA योजना, गॅसलाईन अन् प्लॉटिंग फसवणूक; संजय केळकरांच्या जनसंवादात नागरिकांच्या तक्रारी

Sanjay Kelkar Jan Sanvad: SRA योजना, गॅसलाईन अन् प्लॉटिंग फसवणूक; संजय केळकरांच्या जनसंवादात नागरिकांच्या तक्रारी

0
Sanjay Kelkar Jan Sanvad: SRA योजना, गॅसलाईन अन् प्लॉटिंग फसवणूक; संजय केळकरांच्या जनसंवादात नागरिकांच्या तक्रारी

Sanjay Kelkar: भांजेवाडी येथील रहिवाशांचा विरोध असूनही येथील मालक आणि विकासक एसआरए योजना राबवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप करत येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. यावेळी केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून चौकशी आणि कारवाईची मागणी केली.

भाजप आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा 145 वा कार्यक्रम खोपट येथील भाजपाच्या कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात नौपाडा भागातील भांजेवाडी येथील रहिवासी उपस्थित होते. येथील मालकाने एका विकासकाला ना हरकत प्रमाणपत्र दिले असून विकासकाने एसआरए विभागात कागदपत्रे सादर करून एसआरए योजना राबविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे भांजेवाडीतील 90टक्के रहिवाशांनी या योजनेस विरोध केला असतानाही विकासक दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यावर आमदार संजय केळकर यांनी तत्काळ संबंधित एसआरए अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विकासकाने सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याच्या सूचना केल्या तसेच रहिवाशांवर जबरदस्ती करून योजना राबवता येणार नसून याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/16/big-news-for-students-cet-exams-for-11-courses-to-be-held-twice-tentative-schedule-announced/

तसेच या कार्यक्रमात सावरकरनगर येथील 10 इमारतींचे प्रतिनिधी, खोपट येथील ब्रह्मणदेव सीसायटीचे रहिवासी देखील उपस्थित होते. त्यांना अद्याप घरगुती गॅस लाईन मिळाली नसल्याबाबत त्यांनी निवेदन आमदारांकडे दिले. या संजय केळकर यांनी महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या इमारतींना 10 डिसेंबरपर्यंत गॅस लाईन उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला. गेल्या चार वर्षांत महानगर गॅस, महापालिका आणि रहिवासी यांच्या बैठका घेऊन समन्वयातून ठाणे शहरातील सुमारे 38 हजार कुटुंबांना गॅस लाईन उपलब्ध करून दिल्याचे केळकर यांनी माध्यमांना सांगितले. (Sanjay Kelkar)

तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आदी ग्रामीण भागात विकासक प्लॉटींग करून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे उघडकीस येत आहे. शहापूर येथे गुंतवणूक केलेले काही नागरीकही या कार्यक्रमास हजर राहिले होते. या नागरिकांना संबंधित विकासक प्लॉट नावे करून देत नाही आणि पैसेही परत करत नसल्याच्या तक्रारी या नागरिकांनी या जनसंवादात केल्या. यावर केळकर यांनी तत्काळ संबंधित विकासकाच्या कार्यालयात संपर्क साधला. त्यावेळी विकासकाने ही बाब मान्य करून एक महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे एक रकमी परत करणार असल्याचे कबूल केले, अशी आमदार केळकर यांनी दिली. (Shahapur Plotting Fraud)

दरम्यान, चेंदणी कोळीवाडा येथील रवी उदय सोसायटीचे रहिवासी देखील यावेळी उपस्थित होते. या संकुलात निवृत्त शासकीय अधिकारी राहत असून येथील शासकीय जमिनीवर झालेल्या अतिक्रमणावर गेल्या तीन वर्षांत कारवाई झालेली नाही. आमदार केळकर यांनी तहसिलदारांशी संपर्क करून याबाबत चर्चा केली. यावेळी तहसीलदारांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमातून आमदार केळकर नागरिकांच्या वेळोवेळी समस्या सोडवत असतात. (Thane Latest News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here