Home ताज्या घडामोडी TejRan Wedding News: करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात? ‘देसी ब्लिंग 2’मध्ये सात फेरे घेणार असल्याची चर्चा!

TejRan Wedding News: करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात? ‘देसी ब्लिंग 2’मध्ये सात फेरे घेणार असल्याची चर्चा!

0
TejRan Wedding News: करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात? ‘देसी ब्लिंग 2’मध्ये सात फेरे घेणार असल्याची चर्चा!
नेटफ्लिक्सच्या 'देसी ब्लिंग' या रिॲलिटी शोमध्ये करणने तेजस्वीला हटके अंदाजात प्रपोज केलं होतं. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली.
टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत.सन २०२१ मध्ये बिग बॉस १५ च्या सिझनमध्ये दोघेही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.
बिग बॉसच्या घरात सुरू झालेलं त्यांचं प्रेम, त्यानंतर अनेक वर्षांचं रिलेशनशिप, लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय आणि आता लग्नाची चर्चा. लवकरच दोघे लग्न करणार अशी चर्चा आहे.
तेजस्वी आणि करण यांना चाहत्यांकडून ‘तेजरन’ म्हणून ओळखले जाते. ही लोकप्रिय जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांचा विवाहसोहळा नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शोमध्ये पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
नेटफ्लिक्सच्या ‘देसी ब्लिंग’ या रिॲलिटी शोमध्ये करणने तेजस्वीला हटके अंदाजात प्रपोज केलं होतं. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली.
त्यानंतर आता एका इन्स्टाग्राम पेजने, करण आणि तेजस्वी ‘देसी ब्लिंग 2’ या शोमध्येच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या दोघंही या शोच्या शूटिंगसाठी दुबईमध्ये गेले आहेत. मात्र, त्यांच्या लग्नाबाबत करण, तेजस्वी किंवा नेटफ्लिक्सकडून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
करण कुंद्रा पेक्षा तेजस्वी प्रकाश नऊ वर्षांनी लहान असून करणचा जन्म 11 ऑक्टोबर 1984 रोजी झाला, तर तेजस्वीचा जन्म 10 जून 1993 रोजी झाला आहे. या दोघांच्या वयात 9 वर्षांचे अंतर असूनही दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते.
आता ‘देसी ब्लिंग 2’मध्ये ही जोडी खरोखरच लग्नबंधनात अडकणार का, हे पाहणे आता तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here