Home फोटो गॅलरी Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खडबडीत होऊ नये म्हणून काय कराल? मऊ त्वचेसाठी लक्षात ठेवा 5 गोष्टी

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खडबडीत होऊ नये म्हणून काय कराल? मऊ त्वचेसाठी लक्षात ठेवा 5 गोष्टी

0
Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खडबडीत होऊ नये म्हणून काय कराल? मऊ त्वचेसाठी लक्षात ठेवा 5 गोष्टी
दिवाळीनंतर हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. हिवाळ्यात तापमान कमी होण्यासोबतच हवेतील आर्द्रताही कमी होते. याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. अनेकांना या काळात त्वचा कोरडी, निर्जीव आणि खडबडीत होण्याचा त्रास जाणवतो. केवळ चेहराच नाही, तर हात आणि पायांची त्वचाही कोरडी पडू शकते. काही वेळा त्वचेला भेगा पडण्याची समस्याही उद्भवते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेचा मऊपणा टिकवण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. (AI IMAGE)
हिवाळ्यातही सनस्क्रीन लावा-  थंडीच्या दिवसांत सूर्यप्रकाश कमी जाणवत असला, तरी अतिनील किरणांमुळे (UV Rays) त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे. हवामान थंड असले तरी त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर टाळू नका. (AI IMAGE)
 मॉइश्चरायझरचा नियमित वापर करा-  हिवाळ्यात त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे आंघोळीनंतर आणि चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेला अनुकूल मॉइश्चरायझर लावा. मुरुमांचा त्रास असलेल्या व्यक्तींनीही त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर निवडावे. (AI IMAGE)
शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवा – त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी बाहेरून काळजी घेण्यासोबतच शरीराला पुरेसे पाणी मिळणेही आवश्यक आहे. हिवाळ्यात तहान कमी लागल्याने अनेक जण पाणी पिणे टाळतात. मात्र, दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा. (AI IMAGE)
त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने निवडा –  प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्याने वापरलेले स्किन केअर प्रॉडक्ट आपल्यालाही अनुकूल असेलच असे नाही. डाग, मुरुम किंवा इतर त्वचेच्या समस्यांसाठी कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी त्वचेचा प्रकार लक्षात घ्या. समस्या कायम असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (AI IMAGE)
झोपण्यापूर्वी मेकअप काढा – रात्री मेकअप न काढता झोपल्यास त्वचेवर धूळ, तेल आणि मेकअपचे अवशेष साचू शकतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी डबल क्लिन्झिंग पद्धतीचा वापर करता येतो. प्रथम मेकअप काढण्यासाठी योग्य क्लिन्झर वापरा आणि त्यानंतर फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. हिवाळ्यात त्वचेचा मऊपणा टिकवण्यासाठी नियमित स्वच्छता, मॉइश्चरा यझिंग आणि योग्य हायड्रेशन महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या त्वचेच्या गरजा वेगळ्या असल्याने त्यानुसारच स्किन केअर उत्पादने निवडा. त्वचेची समस्या वाढत असल्यास स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (AI IMAGE)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here