Home महत्वाची बातमी Sunil Tatkare: विलीनीकरण आणि आमदारांच्या फुटीच्या चर्चांमध्ये तथ्य नाही; सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण

Sunil Tatkare: विलीनीकरण आणि आमदारांच्या फुटीच्या चर्चांमध्ये तथ्य नाही; सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण

0
Sunil Tatkare: विलीनीकरण आणि आमदारांच्या फुटीच्या चर्चांमध्ये तथ्य नाही; सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण
(Photo: Twitter/x)

मुंबई(सुहास शेलार): ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असून, ४१ आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. त्यामुळे आमदार फुटण्याचा प्रश्नच नाही. विलिनीकरणाच्या चर्चांमध्येही मला तथ्य वाटत नाही,’ असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली भेट ही दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी होती. त्या वेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.(NoSplit)

https://www.prahaar.in/2026/11/12/went-to-burst-firecrackers-and-fell-into-a-50-foot-deep-gorge-16-year-old-boy-rescued-in-a-dramatic-operation-in-panvel/

तटकरे यांनी ११ नोव्हेंबर रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याआधी १० नोव्हेंबरला त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी दीड तास चर्चा केली होती. या भेटींमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना भेटीमागील भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबरोबरच रोहा येथे ५५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या आधुनिक रेल्वे स्थानकाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. तसेच श्रीवर्धन येथे मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठीही मुख्यमंत्र्यांनी यावे, अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे काही आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी वेळ मागत असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता, ‘मला या संदर्भात माहिती नाही,’ असे तटकरे म्हणाले. मात्र, शरद पवार यांनी सहा दशकांहून अधिक काळ राज्य आणि देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी अनेकांना राजकारणात घडवले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पक्षातील आमदार किंवा कार्यकर्ते भेटायला गेले, तर त्यात गैर काय? मी मुंबईत असेन, तेव्हाही त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणार आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.(PartyUnity)

https://www.prahaar.in/2026/11/12/nashik-diwali-celebrations-in-nashik-marred-by-fire-a-stray-spark-from-a-firecracker-leaves-a-warehouse-reduced-to-ashes/

विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवार यांनी अलीकडेच ‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील,’ असे विधान केले होते. त्यावरून विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली होती. मात्र, या विषयावर सध्या कोणती चर्चा सुरू आहे, असे आपल्याला वाटत नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. शरद पवार यांनी काय बोलावे किंवा बोलू नये, हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे ‘जर-तर’च्या शक्यतांवर चर्चा करण्यात अर्थ नसल्याचेही त्यांनी नमूद केले.(MaharashtraPolitics)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here