Home टेक्नॉलॉजी Google चे ‘Dreambeans’ AI ॲप भारतात लॉन्च, आता दररोज आवडीनुसार मिळणार AI स्टोरीज

Google चे ‘Dreambeans’ AI ॲप भारतात लॉन्च, आता दररोज आवडीनुसार मिळणार AI स्टोरीज

0
Google चे ‘Dreambeans’ AI ॲप भारतात लॉन्च, आता दररोज आवडीनुसार मिळणार AI स्टोरीज

Dreambeans : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज Google ने आपले नवे एक्सपेरिमेंटल ॲप00 ‘Dreambeans’ भारतात लॉन्च केले आहे. या अॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीनिवडी आणि दैनंदिन गरजांनुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार केलेल्या स्टोरीज दररोज पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी वारंवार इंटरनेटवर सर्च करण्याची किंवा कोणतेही प्रश्न विचारण्याची गरज भासणार नाही. Google च्या विविध सेवांमधील माहितीच्या आधारे हे ॲप वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक स्वरूपातील स्टोरीज तयार करणार आहे.

हे ॲप Gmail, Google Photos, Calendar, Search, Gemini आणि YouTube यांसारख्या सेवांशी जोडले जाऊ शकते. कंपनीच्या माहितीनुसार, हे अॅप 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असून Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करता येणार आहे.

काय आहे Google Dreambeans ॲप ?

Google Dreambeans हे Google Labs अंतर्गत विकसित करण्यात आलेले एक प्रयोगात्मक AI ॲप आहे. वापरकर्त्यांच्या आवडीनिवडी आणि गरजांशी संबंधित माहिती त्यांच्यापर्यंत सहज पोहोचवणे हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे. सध्या नवीन माहिती मिळवण्यासाठी अनेकांना सोशल मीडिया स्क्रोल करावे लागते किंवा इंटरनेटवर वेगवेगळ्या गोष्टी सर्च कराव्या लागतात. मात्र, Dreambeans या प्रक्रियेत बदल घडवणार आहे. वापरकर्त्यांच्या आवडीनुसार हे ॲप दररोज नवीन AI स्टोरीज तयार करून दाखवणार आहे.

Gmail, Photos आणि YouTube मधील माहितीचा होणार वापर

Dreambeans ॲप वापरकर्त्याने निवडलेल्या Google अकाउंट आणि सेवांमधील माहितीच्या आधारे वैयक्तिक स्टोरीज तयार करणार आहे. यामध्ये Gmail, Google Calendar, Google Photos, Google Search, Gemini आणि YouTube यांचा समावेश आहे. या सेवांमधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे वापरकर्त्यांच्या आवडी, छंद आणि दैनंदिन गरजांशी संबंधित स्टोरीज दाखवल्या जातील. उदाहरणार्थ, वापरकर्त्याला फिरायला आवडत असल्यास त्याच्या आवडीच्या ठिकाणांशी संबंधित माहिती मिळू शकते. तसेच आर्ट आणि क्राफ्ट, परिसरातील कार्यक्रम, आगामी महत्त्वाची कामे आणि त्यासंबंधी रिमाइंडर्सही पाहायला मिळू शकतात.

https://www.prahaar.in/2026/11/03/whatsapp-to-introduce-new-smart-text-action-feature-tasks-ranging-from-handling-phone-numbers-to-addresses-will-become-easier/

आवडलेल्या स्टोरी सेव्ह आणि शेअर करण्याची सुविधा

Dreambeans मध्ये केवळ स्टोरी पाहण्याचीच नव्हे, तर त्यावर पुढील माहिती मिळवण्याचीही सुविधा असेल. वापरकर्त्यांना आवडलेल्या स्टोरी नंतर वाचण्यासाठी सेव्ह करता येतील. तसेच त्या इतरांसोबत शेअर करण्याचाही पर्याय मिळणार आहे. याशिवाय, ॲपमध्ये फीडबॅक देण्याची सुविधा असेल. वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियांमुळे स्टोरीजचा दर्जा आणि त्यांची उपयुक्तता सुधारण्यास Google ला मदत होणार आहे.

AI च्या मदतीने फोटोचे व्हिडिओमध्ये रूपांतर

Dreambeans ॲपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे AI च्या मदतीने स्थिर फोटोंना ॲनिमेटेड स्वरूप देता येणार आहे. यासाठी Google च्या Veo AI व्हिडिओ जनरेशन मॉडेलचा वापर केला जात आहे.या सुविधेमुळे काही निवडक स्टोरीजमधील फोटोमध्ये हालचाल निर्माण करता येईल. त्यामुळे वापरकर्त्यांना केवळ स्थिर चित्रांऐवजी अधिक आकर्षक आणि जिवंत स्वरूपातील व्हिज्युअल्स पाहायला मिळतील.

https://www.prahaar.in/2026/11/03/electric-diya-no-oil-no-wick-a-smart-electric-lamp-lights-up-with-just-a-spoonful-of-water-what-is-the-reason-behind-this/

14 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध

Google ने Dreambeans ॲप भारतात 18 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले आहे. हे ॲप Android आणि iOS दोन्ही डिव्हाइसवर डाउनलोड करता येणार आहे. विशेष म्हणजे, या ॲपमध्ये एकूण 14 भाषांना सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, बंगाली, तेलुगू, मराठी, तमिळ, उर्दू, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, आसामी आणि नेपाळी या भाषांचा समावेश आहे.मात्र, वापरकर्त्यांना एका वेळी केवळ एकच भाषा निवडून स्टोरीज तयार करून घेता येणार आहेत.

AI ॲप्सच्या जगात Google चे नवे पाऊल

Dreambeans च्या माध्यमातून Google ने AI आधारित वैयक्तिक कंटेंट उपलब्ध करून देण्याच्या दिशेने नवे पाऊल टाकले आहे. वापरकर्त्यांना स्वतः माहिती शोधण्याऐवजी त्यांच्या आवडीनुसार माहिती मिळवून देणे, हा या अॅपमागील महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे भविष्यात AI आधारित कंटेंट पाहण्याच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here