कोकणवासीयांची महत्त्वाची इच्छा पूर्ण, मुंबई सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 16 डब्ब्यांनी धावणार
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल महत्त्वाची अपडेट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धावत असलेली 8 डब्ब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस 16 डब्ब्यांची होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर या एक्स्प्रेसच्या डब्ब्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.मुंबई सीएसएमटी मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस जून 2023 पासून प्रवाशांच्या सेवेमध्ये आहे. तेव्हापासून प्रवाशांकडून दमदार प्रतिसाद ह्या एक्स्प्रेसला मिळताना दिसत आहे. कोकणवासीयांकडून वंदे भारत एक्स्प्रेसला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता, मध्य रेल्वेने त्या एक्स्प्रेसच्या आसन क्षमतेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.9 नोव्हेंबरला मुंबई सीएसएमटी- मडगाव- मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसची शेवटची 8 डब्ब्यांची फेरी पूर्ण होईल. त्यानंतर, मुंबई सीएसएमटी- मडगाव- मुंबई सीएसएमटी मार्गावर 10 नोव्हेंबरपासून 16 डब्यांची वंदे भारत धावणार आहे. 16 डब्ब्यांच्या एक्स्प्रेसमुळे आता प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.जेव्हा वंदे भारत एक्स्प्रेस 8 डब्ब्यांची होती तेव्हा आसन क्षमता 530 ची होती. पण आता 16 डब्ब्यांची एक्स्प्रेस धावणार असल्यामुळे 1128 इतकी आसनक्षमता होणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पहिल्या दिवसापासून गाडीला 100 टक्के आरक्षण आहे. कोकण रेल्वेवर वक्तशीरपणात धावणारी एकमेव गाडी म्हणून मुंबई- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची ओळख आहे.कोकणामध्ये जाण्यासाठी प्रवाशांना वंदे भारत शिवाय, जनशताब्दी, तेजस, मंगळुरू, कोकणकन्या, मांडवी या एक्स्प्रेस आहेत. पण या एक्स्प्रेस केव्हाच वेळेवर धावत नाहीत. तीन वर्षांपासून वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई सीएसएमटी- मडगाव मार्गावर धावतेय. पहिल्या दिवसापासून या गाडीला 100 टक्के आरक्षण आहे. कायमच प्रवाशांना वेळेवर पोहोचवण्यात ह्या एक्स्प्रेसचा आजवरचा रेकॉर्ड आहे.22229 डाऊन 22230 मुंबई सीएसएमटी- मडगाव- मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातील इतरत्र सर्व दिवस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल आहे. ह्या एक्स्प्रेसचा दादर, ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण/ रत्नागिरी, कणकवली, थिविम आणि मडगाव या स्थानकांवर थांबा आहे. ह्या एक्स्प्रेसच्या वेळेमध्ये कोणताही बदल झालेला नाही.