दिवाळीत घराला द्या शाही लुक! कमी खर्चात सजावटीसाठी वापरा या 5 खास आयडिया (Photo Pintrest)
पितळी कुंड्यांनी सजवा: घर दिवाळीच्या सजावटीत पितळी वस्तूंना विशेष महत्त्व असते. घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा हॉलमध्ये पितळी कुंड्या ठेवून त्यात पाणी, गुलाबाच्या पाकळ्या, झेंडूची फुले आणि तरंगते दिवे ठेवता येतात. मोठ्या पितळी कुंड्यांना आंब्याच्या पानांच्या माळांनी सजवल्यास घराला पारंपरिक आणि आकर्षक लुक मिळतो.
आरसे आणि वॉल हँगिंग्जने सजवा: भिंती घराच्या भिंतींना नवा लुक देण्यासाठी मोठ्या सजावटीच्या आरशांचा वापर करता येतो. सोनेरी किंवा आकर्षक नक्षीकाम असलेले आरसे भिंतींची शोभा वाढवतात. यासोबत गुलाबी, लाल, पिवळ्या आणि सोनेरी रंगांतील वॉल हँगिंग्ज लावल्यास सजावटीत वेगळेपणा येतो. आरशांमुळे प्रकाश परावर्तित होऊन खोली अधिक उजळ आणि प्रशस्त दिसू शकते.दिव्यांनी घर उजळवा: दिवाळीच्या सजावटीमध्ये रोषणाईला विशेष महत्त्व आहे. घराला सुंदर आणि प्रसन्न वातावरण देण्यासाठी उबदार प्रकाश देणारे दिवे वापरता येतात. हॉलच्या कोपऱ्यात फ्लोअर लॅम्प, टेबलवर डिझायनर दिवे आणि भिंतींवर वॉल लाईट्स लावता येतात. याशिवाय काचेचे किंवा धातूचे कँडल होल्डर वापरल्यास सजावटीला आकर्षक रूप मिळते.फेअरी लाइट्सने सजवा: बाल्कनी दिवाळीत घराच्या बाल्कनीची सजावटही तितकीच महत्त्वाची असते. बाल्कनीच्या कठड्यावर फेअरी लाइट्स, एलईडी दिवे किंवा छोटे कंदील लावून सुंदर रोषणाई करता येते. वाऱ्यामुळे पारंपरिक दिवे विझण्याची शक्यता असल्याने सुरक्षित एलईडी दिव्यांचा पर्याय वापरता येतो. मात्र, विजेच्या जोडण्या पावसापासून आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. फुलांच्या माळा आणि रांगोळीने सजवा : प्रवेशद्वार घराचे मुख्य प्रवेशद्वार आकर्षक दिसण्यासाठी झेंडूच्या फुलांच्या माळा आणि रंगीबेरंगी रांगोळीचा वापर करता येतो. दारासमोर फुलांची रांगोळी काढून त्याभोवती छोटे दिवे लावा. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना फुलांच्या माळा लावून सुंदर कमान तयार करता येते. या सजावटीमुळे घराला पारंपरिक आणि प्रसन्न लुक मिळतो.