Home ब्रेकिंग न्यूज Mushtaq Khan Dies: ‘वेलकम’फेम अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन; वयाच्या 56 व्या वर्षी दुर्धर आजारामुळे निधन

Mushtaq Khan Dies: ‘वेलकम’फेम अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन; वयाच्या 56 व्या वर्षी दुर्धर आजारामुळे निधन

0
Mushtaq Khan Dies: ‘वेलकम’फेम अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन; वयाच्या 56 व्या वर्षी दुर्धर आजारामुळे निधन
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: बॉलिवूड सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन झाले आहे. ते 56 वर्षांचे होते. मुश्ताक खान यांचे कॅन्सर आजारामुळे निधन झाले आहे. मुश्ताक खान यांच्या निधनाचे वृत्त काही वेळापूर्वी एएनआय न्यूज ने दिलेले आहे. गेल्या 15 दिवसांपासून मुश्ताक यांच्यावर मुंबईतल्या नानावटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. पण उपचारा अंती आज (24 सप्टेंबर- गुरूवार) सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीला दिलेले आहेत. ‘वेलकम’, ‘गदर’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम है राही प्यार के’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये मुश्ताक खान यांनी काम केले आहे.

https://www.prahaar.in/2026/09/24/sunil-pals-scathing-criticism-of-salman-khans-bigg-boss-he-said-bhaijaan-shut-down-this-gutter-show-first/

मुश्ताक खान गेल्या अनेक वर्षांपासून लिव्हरच्या कॅन्सरशी लढा देत होते. पण या गंभीर आजाराशी लढत असतानाच त्यांचं निधन झाले आहे. मुश्ताक खान यांच्या निधनामुळे अवघ्या बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुश्ताक यांच्यावर मुंबईतील विलेपार्लेतील नानावटी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. मुश्ताक यांचे जवळचे मित्र आणि विनोदी कलाकार सुनील पाल यांनी माध्यमांसोबत बोलताना त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, मुश्ताक यांच्यावर उद्या अर्थात, 25 सप्टेंबर गुरूवारी मुंबईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अद्याप त्यांच्या अंत्यविधीबद्दल पुढची अपडेट कळू शकलेली नाही.

 

मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैहर या छोट्या गावात मुश्ताक यांचा जन्म झाला होता. मुश्ताक यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी मुंबई गाठली. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणाचीही ओळख नसतानाही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मुश्ताक यांनी 1980 पासून बॉलिवूडमध्ये अभिनयाची सुरूवात केली. मुश्ताक खान यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये सहाय्यक भूमिका आणि विनोदी भूमिकांच्या माध्यमातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चाहत्यांमध्ये आपली छाप पाडली. ‘वेलकम’मधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. ‘गदर’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम है राही प्यार के’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांतून त्यांनी आपला ठसा उमटवला. मुश्ताक खान जरीही आज आपल्यामध्ये नसले तरीही ते कायमच आपल्या सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमांतून चाहत्यांमध्ये जिवंत राहतील, यामध्ये शंका नाही.

https://www.prahaar.in/2026/09/24/shaque-trust-no-one-series-review-parineeti-chopra-tahir-raj-bhasin-jennifer-winget/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here