Home ब्रेकिंग न्यूज US Iran War : अमेरिका-इराण युद्धाची व्याप्ती वाढणार? हिंद महासागरापर्यंत युद्ध पसरवण्याचा इराणचा थेट इशारा

US Iran War : अमेरिका-इराण युद्धाची व्याप्ती वाढणार? हिंद महासागरापर्यंत युद्ध पसरवण्याचा इराणचा थेट इशारा

0
US Iran War : अमेरिका-इराण युद्धाची व्याप्ती वाढणार? हिंद महासागरापर्यंत युद्ध पसरवण्याचा इराणचा थेट इशारा
US Iran War(source chat Gpt)

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आता एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक वळण घेतले आहे. या युद्धाला नऊ महिने पूर्ण झाले असून, अद्यापही युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यातच, अमेरिकेने पुन्हा कोणतीही लष्करी कारवाई किंवा हल्ला केल्यास, हा संघर्ष थेट हिंद महासागरापर्यंत वाढवला जाईल, असा सज्जड आणि गंभीर इशारा इराणच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिला आहे.(US Iran War)

इराणच्या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओनुसार, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे वरिष्ठ सल्लागार याह्या रहीम सफवी यांनी हा इशारा दिला आहे. “सध्या हा संघर्ष पर्शियन आखात आणि होर्मुझ सामुद्रधुनीपासून लाल समुद्रापर्यंत पसरला आहे. मात्र, अमेरिकेने आणखी एक हल्ला केल्यास हा संघर्ष आणखी पुढे जाऊन हिंद महासागरापर्यंत आणि कदाचित त्याही पुढे पोहोचू शकतो,” असे सफवी यांनी स्पष्ट केले आहे. मध्य-पूर्वेतील तणाव आधीच सर्वोच्च पातळीवर असताना आणि होर्मुझ सामुद्रधुनी ते लाल समुद्रापर्यंत जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प असताना या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/24/will-bangladesh-play-in-the-world-test-championship-2027-final-coach-statement-sparks-intense-speculation/

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, कोणतीही नवी धमकी मिळाल्यास ते आपल्या लष्करी धोरणात आणि लक्ष्यांमध्ये मोठा बदल करतील. तसेच संपूर्ण प्रदेशातील अमेरिकेच्या हितसंबंधांना प्रत्युत्तर दिले जाईल.(US Iran War)

भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेवर वाढती जोखीम

हा संपूर्ण संघर्ष आता हिंद महासागरापर्यंत पोहोचल्यास त्याचे जागतिक व्यापारावर आणि विशेषतः भारतावर गंभीर परिणाम होऊ शकतात. हिंद महासागर हा जगातील तिसरा सर्वात मोठा महासागर असून, त्याचे क्षेत्रफळ सुमारे 70.5 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे. हा महासागर पर्शियन आखाताला आशियातील प्रमुख अर्थव्यवस्थांशी जोडतो. याच मार्गातून जगातील अत्यंत महत्त्वाचे सागरी व्यापार चालतात.

https://www.prahaar.in/2026/09/24/residents-of-thane-use-water-judiciously-water-supply-to-be-shut-off-for-24-hours-on-september-26/

भारत हिंद महासागराच्या उत्तरेकडील भागात असून आखाती देश, आफ्रिका आणि आग्नेय आशियासोबत भारताचे मोठे सागरी व्यापारी संबंध आहेत. हा संघर्ष वाढल्यास जहाज वाहतूक, सागरी विमा, ऊर्जा पुरवठा आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील जोखीम कैक पटीने वाढणार आहे. आधीच अमेरिका-इराण युद्धाचा फटका बसल्याने तेल, एलपीजी आणि मालवाहतुकीचा खर्च वाढला आहे, ज्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्था आधीच दबावाखाली आहेत. आता या नवीन इशाऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून सर्व देशांचे लक्ष या परिस्थितीकडे लागले आहे.(US Iran War)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here