Home क्रीडा वैभव सूर्यवंशीने उडवली होती गौतम गंभीरची झोप, रात्रभर विचारात गुंतला! नेमकं काय घडलं होतं?

वैभव सूर्यवंशीने उडवली होती गौतम गंभीरची झोप, रात्रभर विचारात गुंतला! नेमकं काय घडलं होतं?

0
वैभव सूर्यवंशीने उडवली होती गौतम गंभीरची झोप, रात्रभर विचारात गुंतला! नेमकं काय घडलं होतं?
वैभव सूर्यवंशीने उडवली होती गौतम गंभीरची झोप, रात्रभर विचारात गुंतला! नेमकं काय घडलं होतं? (Photo: BCCI Twitter)

एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जापानमध्ये आहे. वैभव सूर्यवंशीही एशियन गेम्स स्पर्धा खेळण्यासाठी जापानमध्ये संघासोबत आहे. मात्र त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल की नाही हे सांगणं कठीण आहे. दुसरीकडे, प्रशिक्षक गौतम गंभीर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतात आहे. असं असताना वैभव सूर्यवंशीमुळे टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची रात्रीची झोप उडाली होती. त्याचं कारणही तसंच होतं. याबाबतचा खुलासा खुद्द गौतम गंभीर याने केला आहे. त्याने इंग्लंड दौऱ्यात काय झालं होतं? याबाबत सांगताना हा खुलासा केला. इंग्लंड दौऱ्यात एक निर्णय घेताना त्याच्या मनाची घालमेल झाली होती. क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात कठीण निर्णय असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या निर्णयाच्या मुळाशी वैभव सूर्यवंशी होता. त्यामुळे त्याला रात्रभर झोप लागली नाही.

वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेपूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीर याने जियो हॉटस्टारशी संवाद साधला. गौतम गंभीरने सांगितलं की, इंग्लंड दौऱ्यात संजू सॅमसनला बसवून वैभव सूर्यवंशीला खेळवणं हा कोचिंग करिअरमधील सर्वात कठीण निर्णय होता. या निर्णयामुळे रात्रभर झोप लागली नाही. इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. त्यानंतर संजू सॅमसनला बसवून वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली. पण हा निर्णय का घेतला? याबाबत सांगताना गौतम गंभीर म्हणाला की, वैभव सूर्यवंशी फॉर्मात होता आणि भारताला ही मालिका जिंकायची होती. पण संजू सॅमसन टी20 वर्ल्डकप स्पर्धेत प्लेयर ऑफ द टूर्नामेंट होता, त्यामुळे हा निर्णय घेताना कठीण गेलं. पण या निर्णयाबाबत प्रामाणिकपणे संजू सॅमसनशी चर्चा केली होती, असंही गंभीर पुढे म्हणाला.

https://www.prahaar.in/2026/09/24/will-bangladesh-play-in-the-world-test-championship-2027-final-coach-statement-sparks-intense-speculation/

गौतम गंभीरने सांगितलं की, प्रशिक्षकाच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीतील ती सर्वात कठीण रात्र होती. मी रात्रभर झोपू शकलो नाही. मी याबाबत संजू सॅमसनला सांगितलं होतं. संजूने हा निर्णय समजून घेतला आणि निवांतपणे मान्यही केलं. ही चर्चा फक्त संजू आणि माझ्यात झाली होती. या मालिकेनंतर संजू सॅमसन भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळला. या मालिकेत वैभव सूर्यवंशी ऐवजी संजूला संधी दिली गेली. त्या संधीचं संजू सॅमसननं सोनं केलं आणि 2 अर्धशतकं ठोकली. इतकंच काय तर अफगाणिस्तानला क्लिन स्विप दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here