Thursday, August 6, 2026

Jalgaon Gold Rate : सोने चांदीचे भाव गगनाला ! जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मोठी उलथापालथ

Jalgaon Gold Rate : सोने चांदीचे भाव गगनाला ! जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मोठी उलथापालथ

Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Jalgaon Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने थोडेफार चढउतार सुरु होते. मात्र, बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर दोन्ही धातूंचे दर अचानक उसळल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली. गुरुवारी दर कमी होऊन ग्राहकांना काहीसा दिलासा मिळेल असे वाटत असताना गुरुवारी जळगाव सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा तेजी पहायला मिळाली आहे. दोन्ही धातूंचे दर अचानक वधारल्याने दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. (Jalgaon Gold Rate)

Gold hit a seven-week high : सात आठवड्यांचा उच्चांक गाठला

जागतिक सराफा बाजारात मौल्यवान धातूंना पुन्हा एकदा तेजीचे वेध लागले असून, सोन्याच्या किमतींनी सलग चौथ्या व्यवहार सत्रात वाढ नोंदवत सात आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. तर चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळल्याचे चित्र आहे. अमेरिकन डॉलरमधील कमजोरी, ट्रेझरी बाँडवरील घसरते परतावे आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. (Jalgaon Gold Rate)

Jalgaon Gold Rate : सोन्याचे आजचे दर किती ?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Jalgaon Gold Market) मंगळवारी ३०९ रुपयांची किरकोळ वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४७,५९९ रुपयांपर्यंत होते. तर बुधवारी २८८४ रुपयांची दरवाढ झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५०,१७४ रुपयांपर्यंत पोहचले होते. गुरुवारी सकाळी बाजारपेठ  (Jalgaon Gold Market) उघडल्यावर आणखी ३०९० रुपयांची वाढ झाली. परिणामी, सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,२६४ रुपयांपर्यंत वधारले. दोनच दिवसांत सोन्याचे दर ५९७४ रुपयांनी महागल्याचे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Jalgaon Gold Rate)

Jalgaon Silver Rate  चांदीचे आजचे दर किती ?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Jalgaon Gold Market) मंगळवारी कोणतीच घडामोड न झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह २,२८,६६० रुपयांवर स्थिरावले होते. तर बुधवारी तब्बल ६१८० रुपयांची दरवाढ झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति १० ग्रॅम २,३४,८४० रुपयांपर्यंत पोहचली होती. गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी २०६० रुपयांची दरवाढ झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३६,९०० रुपयांपर्यंत वधारली. दोनच दिवसांत चांदीचे दर ८२४० रुपयांनी महागल्याचे दिसून आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >