Home ब्रेकिंग न्यूज Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार ‘जेन-झीं’शी संवाद

Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार ‘जेन-झीं’शी संवाद

0
Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार ‘जेन-झीं’शी संवाद
Mohan Bhagwat

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे विचारमंथन करत असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत येत्या ६ ऑगस्ट रोजी मुंबईत नव्या पिढीच्या प्रतिनिधींशी (जेन-झी) संवाद साधणार आहेत. ‘इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’ (आयआयएमयूएन) या संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक चॅम्पियनशिप परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात सरसंघचालक उपस्थित राहून तरुणांना मार्गदर्शन करतील.

https://prahaar.in/2026/08/03/devendra-fadnavis-citizen-facing-government-departments-to-move-to-the-air-india-building-chief-minister-directs-officials-to-ensure-the-general-public-faces-no-inconvenience/

जगातील सर्वात मोठ्या युवा नेतृत्व संमेलनांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेत देशभरातील १०० हून अधिक शहरांमधील १५ ते १९ वयोगटातील दोन हजारांपेक्षा जास्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ऋषभ शाह यांनी २०११ मध्ये स्थापन केलेली ‘आयआयएमयूएन’ ही संस्था भारताची संस्कृती आणि विचारसरणी जागतिक पटलावर रुजवणारे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे, गेल्या १५ वर्षांपासून १५ ते २४ वयोगटातील तरुणच या संस्थेचा संपूर्ण कारभार सांभाळत आहेत. या मंचावरून घडलेले अनेक तरुण आज लोकप्रतिनिधी, आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी, वकील, लेखक आणि यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत.

https://prahaar.in/2026/08/03/taj-group-project-coming-soon-to-devgad-minister-nitesh-rane-shares-details/

या संस्थेच्या सल्लागार मंडळात देशातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती अजय पिरामल, दीपक पारेख आणि नादिर गोदरेज यांच्यासह खासदार डॉ. शशी थरूर, माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि महान धावपटू पी. टी. उषा यांसारख्या नामवंत व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here