लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोप !
कोलकाता : आयपीएल स्टार अभिषेक पोरेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार,तिचे खाजगी फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने पोरेल आणि त्याच्या एका साथीदाराला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे. (Abhishek Porel )
https://prahaar.in/2026/07/21/some-are-attempting-to-spread-anarchy-under-the-guise-of-the-protests-in-delhi/
उच्च न्यायालयाचे कडक कारवाईचे निर्देश
कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील मगरा पोलीसांना अभिषेक आणि त्याच्या साथीदाराची त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, पीडीतेचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ अधिक व्हायरल होऊ नये, यासाठी दोन्ही आरोपींचे मोबाइल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्याचे आदेश कोलकाता न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. (Kolkata)
https://prahaar.in/2026/07/21/the-starter-marriage-trend-if-it-works-fine-otherwise-divorce-what-is-this-new-concept-of-starter-marriage/
पीडितेचे गंभीर आरोप
पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार,प्रेमाचे नाटक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिच्या नकळत खाजगी फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले आणि नंतर ते सार्वजनिक करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यात आले आहे. पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात हा आरोप केला आहे की, आरोपींनी केवळ याच विद्यार्थीनीला नाही, इतर अजून महिलांवरही लैंगिक अत्याचार केला आहे. वकिलांनी या संदर्भात न्यायालयासोमर काही पुरावेही सादर केले आहेत.(Medical Student)
https://prahaar.in/2026/07/21/kalyan-murder-case-drishyam-plot-fails-landlord-receives-voicemail-exposing-the-crime-boyfriends-body-found-in-a-sack/
या प्रकरणी यापूर्वीच मगरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपींची इलेक्ट्रॉनिक उपकरणे अद्याप जप्त करण्यात आलेली नाहीत. पोलिसांनी न्यायालयाला आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. न्यायालयाने तपासाचा सविस्तर अहवाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे.मात्र या संपूर्ण प्रकराणात युवा खेळाडू अभिषेक पोरेलचा नाव आल्याने संपूर्ण क्रिकेट विश्वात वेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.