Tuesday, July 21, 2026

Team India Zimbhave Tour : भारताचा युके दौरा संपला;आता झिम्बाब्वेविरुद्धचे पुढचे सामने कधी ?

Team India Zimbhave Tour : भारताचा युके दौरा संपला;आता झिम्बाब्वेविरुद्धचे पुढचे सामने कधी ?

मुंबई : इंग्लंड दौऱ्यात निराशाजनक कामगिरीनंतर भारतासमोर आता झिम्बाब्वेविरुद्ध पुनरागमन करण्याची संधी आहे. भारताच्या झिम्बाब्वेदौऱ्याची सुरुवात २३ जुलैपासून होणार आहे. या दौऱ्याच्या सुरुवात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेपासून होणार आहे. मालिकेतील पहिला सामना २३ जुलैला हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सुरुवात होणार आहे. (Shreyas Ayaar )

या मालिकेसाठी कर्णधार श्रेयस अय्यर इंग्लंडहून थेट झिम्बाब्वेला रवाना होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी असलेले इतर खेळाडूही लवकरच संघात दाखल होतील. दरम्यान, उर्वरित खेळाडू मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली आधीच झिम्बाब्वेला पोहोचले आहेत. भारतीय खेळाडूंना या दौऱ्यासाठी केवळ दोन दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे खेळाडूंची फिटनेस आणि आरोग्यवर काम करणे व्यवस्थापनासाठी मोठे आव्हान असेल. (Indian Cricket Team)

भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिकेचे वेळापत्रक

२३ जुलै – पहिला टी-२०, हरारे

२५ जुलै – दुसरा टी-२०, हरारे

२६ जुलै – तिसरा टी-२०, हरारे

या मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४ :३० वाजता सुरू होतील.तर नाणेफेक चार वाजता होईल.

भारताचा टी-२० संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव आणि प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक). (Ind vs Zim)

सामने कुठे पाहता येतील ?

भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर उपलब्ध नसून, सर्व सामने FanCode ॲप आणि वेबसाइटवर थेट पाहता येणार आहेत.यूके दौऱ्यात भारताला आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिका ०-२, इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका ०-४, तर वनडे मालिका १-२ अशा पराभवांना सामोरे जावे लागले. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धची मालिका भारतासाठी आत्मविश्वास परत मिळवण्याची मोठी संधी आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >